उपाययोजनांचा सुपरिणाम : कित्येक कोटींच्या अघोषित उत्पन्नाचा शोध
मुंबई प्रतिनिधी
26 जुलै
गेल्या काही वर्षात, परदेशात लपविलेला काळा पैसा आणण्यासाठी सरकारने काळा पैसा (अघोषित परदेशी उत्पन्न व मिळकत) विरोधी व करआकारणी कायदा 2015 अंतर्गत अनेक उपाययोजना केल्या. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात हा खुलासा केला.
केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे 31.05.2021 पर्यंत पुढील परिणाम घडून आले, असे चौधरी यांनी सांगितले.
31.05.2021 पर्यंत काळा पैसा विरोधी कायदा 2015 अंतर्गत असलेल्या कलम 10(3)10(4) चा वापर 166 केसेसमध्ये करण्यात आला व त्याद्वारे 8,216 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली.
हडइउ केसमध्ये अंदाजे 8,465 कोटी रुपयांच्या अघोषित उत्पन्नावर कर आणि दंडाद्वारे 1,294 कोटी रुपये आकारण्यात आले.
खउखग (आंतरराष्ट्रीय शोध पत्रकार गट) संबधीत केसेसमध्ये अंदाजे 11,010 कोटींचे एकूण अघोषित उत्पन्न शोधण्यात आले.
पनामा पेपर्स लीक केसेसमध्ये 20,078 कोटी रुपयांच्या अघोषित उत्पन्नाचा शोध लावण्यात आला.
पॅराडाईज पेपर्स लीक केसेसमध्ये 246 कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्नाचा शोध लावण्यात आला.