आयसीआयसीआय लोम्बार्डकडून कोरोना लसीकरणाची मोहिम वेगात
धारावी, वरळी व्हिलेजमध्ये तब्बल 50 हजार व्यक्तींच्या लसीकरणाचे उद्दीष्ट
मुंबई, ता. 23 जुलै 2021 : देशातील आघाडीच्या खासगी जनरल इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्डने देशाच्या कोरोना प्रतिबंध लसीकरणाला वेग देण्यासाठी महालसीकरण मोहिम हाती घेत पुढाकार घेतला आहे. या लसीकरण मोहिमेमुळे वंचित आणि अल्प उत्पन्न गटातील सुमारे 50 हजार व्यक्तींना मोफत लस दिली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत धारावी आणि वरळी व्हिलेज या भागात लसीकरण कॅम्प सुरु करण्यात आलेले आहेत. भारतात एखाद्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आलेली ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी मोहिम आहे.
मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी कोरोना लाटेत हॉटस्पॉट ठरले होते आणि ती खरोखर चिंतेची बाब आहे. धारावीत किमान दहा लाख रहिवाशी राहत असल्याचा अंदाज असून ही झोपडपट्टी 535 एकरांवर वसलेली आहे. धारावीच्या लोकसंख्येची घनता प्रतिमैल आठ लाख 69 हजार 565 एवढी प्रचंड आहे. अशा घनदाट लोकसंख्येचे लसीकरण करणे हे देशाच्या कोरोना विषाणूच्या लढाईविरोधात अतिशय महत्वाचे ठरले आहे.
सुराणा सेठिया हॉस्पीटल अॅण्ड रिसर्च सेंटरच्या साथीने आयसीआयसीआय लोम्बार्ड घरोघरी लसीकरण मोहिम तेथे राबवत आहे. त्यासाठी कोवीन अॅपवर रहिवाशींची नोंदणी करण्यापासून त्यांना लस देण्यापर्यंतची कामे केली जात आहेत.
धारावीच्या जीवन हॉल आणि प्रजापती हॉलमध्ये ही लसीकरण मोहिम सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळत राबविली जात आहे. धारावीत 10 जुलैपासून सुरु करण्यात आलेल्या या मोहीमेत 22 जुलैपर्यंत तब्बल आठ हजार 948 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आलेले आहे. आगामी दहा-बारा दिवसात 50 हजार व्यक्तींचे लसीकरण पुर्ण करण्याचे कंपनीचे उद्दीष्ट आहे. या मोहिमेसाठी तपासणीस, नर्सेस, डॉक्टर आणि निमवैद्यकीय सहाय्यक अशा साठ व्यक्तींचा चमू कार्यरत आहे.
लसीकरणाच्या मोहिमेबद्दल बोलताना आयसीआयसीआय लोम्बार्डचे विशेष संचालक संजीव मंत्री म्हणाले की, विषाणूच्या नवनवीन बदलातून कोवीड-19 हा पुन्हा फैलावत असल्याने लोकसंख्येचे व्यापक प्रमाणात लसीकरण हीच या संकटावर मात करण्याची प्रभावी मात्रा होय. ग्राहक आणि समाजाला त्यांच्या संकटकाळात सीएसआरच्या माध्यमातून मदत करण्यावर आयसीआयसीआय लोम्बार्डचे सदैव लक्ष केंद्रीत राहीलेले आहे. गरजू व्यक्तींच्या लसीकरणासाठी मोहीम सुरु केल्याने आम्ही सदगदीत आणि प्रोत्साहीत झालो असून त्याद्वारे देशाच्या लसीकरण मोहिमेला हातभार लावत आहोत. यो मोहिमेला आम्हाला पाठबळ दिल्याबद्दल आम्ही सरकारी अधिकारी, मुंबईचे माननीय महापौर यांना धन्यवाद देत आहोत. त्याचबरोबर डॉ. सुराणा आणि सुराणा हॉस्पीटलच्या चमूलासुध्दा या कार्यासाठी आवश्यक ती सामुग्री पुरविल्याबद्दल मी धन्यवाद देत आहे.
सुराणा हॉस्पीटल समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रिन्स डी. सुराणा म्हणाले की, या महान सेवेसाठी आयसीआयसीआय लोम्बार्डबरोबर भागीदारी करताना आम्हाला आंनद होत आहे. झोपडपट्टीचा भाग असलेल्या धारावी आणि वरळीसारख्या ठिकाणी 50 हजार लोकसंख्येचे लसीकरण केल्याने सरकारवरील ताण कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबविल्याने मुंबईत अतिशय दाटीवाटीने राहत असलेल्या मोठ्या लोकसंख्येमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास मदत होईल. या मोहिमेच्या लाभार्थींकडून आम्हाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
एक जबाबदार कॉर्पोरेट घटक या नात्याने आयसीआयसीआय लोम्बार्डने राष्ट्रीय आणि सामाजिकदृष्ट्या परिणामकारक प्रसगांत हातभार लावत त्यांच्या ब्रॅण्डचे ब्रीदवाक्य असेल्या ‘निर्भय वादे’ या शब्दांना प्रभाव टाकणाऱ्या विविधांगी क्षेत्रात सच्चाईत उतरविले आहे. सध्याच्या महामारीच्या काळात मदत करण्यात कंपनी सर्वात अग्रभागी आहे. कोवीड पॉझिटिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या नागपूर, दिल्ली आणि लखनौ येथे कंपनीने एक हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र पुरविली आहेत. पश्चिम बंगालच्या न्यू टाऊनमध्ये कोवीड रुग्णांवर उपचार करण्यासाठी परिपुर्ण कोवीड केअर सेंटर उभारण्यासाठी कंपनीने निओतिया समुहाबरोबर भागीदारी केलेली आहे. लसीकरणाची मागणी वेगाने वाढत असताना त्या मोहिमेची गती कायम राखणे आणि अधिकाधिक लोकसंख्येच्या लसीकरणास हातभार लावणे आवश्यक आहे.