डिजिटल तंत्रज्ञान उपलब्ध नसणार्या लोकांची नोंदणी आणि लसीकरण
मुंबई प्रतिनिधी
20 जुलै
देशात ज्या लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे त्या सर्वांची कोविन पोर्टलवर नोंदणी झालेली आहे. लसीकरणाची नेमकी सत्य स्थिती दर्शविणारा कोविन पोर्टल हा एकमेव स्त्रोत आहे.
16 जुलै 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 3 लाख 48 हजार मात्रा (देण्यात आलेल्या एकूण मात्रांच्या 0.09म मात्रा) कोणतेही ओळखपत्र नसलेल्या व्यक्तींना देण्यात आल्या आहेत. राज्य केंद्रशासितप्रदेश निहाय तपशील परिशिष्टात दिला आहे.
ज्या व्यक्ती डिजिटल तंत्रज्ञान वापरू शकत नाहीत किंवा ज्यांच्याकडे हे तंत्रज्ञान उपलब्ध झालेले नाही अशा व्यक्तींची नोंदणी तसेच लसीकरण खालील मार्गांनी होऊ शकेल:
कोविड-19 लसीकरण केंद्रावर एका व्यक्तीची किंवा व्यक्तींच्या गटाची थेट नोंदणी
सामान्य सेवा केंद्रांमध्ये नोंदणी
मोबाईल फोन नसलेल्या व्यक्तींची सुलभतेने नोंदणी करण्यासाठी एका मोबाईल क्रमांकाचा वापर करून जास्तीतजास्त 4 व्यक्तींची नोंदणी
निर्धारित सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये सुविधा पुरविणार्या महत्त्वाच्या व्यक्तींसाठी विहित फोटो ओळखपत्र नसलेल्या व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी तपशीलवार प्रमाणित परिचालन पद्धती जारी करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.