कोविड-19 लसीकरण अद्ययावत स्थिती

मुंबई प्रतिनिधी

20 जुलै

देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. कोविड सार्वत्रिक लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा 21 जून 2021 रोजी सुरु झाला आहे. लसींची अधिक उपलब्धता, उपलब्ध होणार्‍या लसींच्या साठ्याविषयी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आगावू सूचना देऊन, त्याद्वारे लसींची पुरवठा साखळी सुनियोजित करण्याचा प्रयत्न, यातून लसीकरण मोहीमेला गती देण्यात आली आहे.

राष्ट्रीय लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून, केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत कोविड लसी पुरवत आहे. नव्या टप्प्यात देशातील 75 टक्के लसी केंद्र सरकार खरेदी करत असून त्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवल्या जात आहेत.

आतापर्यंत राज्येकेंद्रशासित प्रदेशांना 42.15 कोटींपेक्षा अधिक (42,15,43,730) लसींच्या मात्रा पुरविण्यात आल्या आहेत,आणि पुढील काही दिवसांत आणखी 71,40,000 मात्रा पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

यापैकी, वाया गेलेल्या लसींच्या मात्रांसह एकूण 40,03,50,489 मात्रांचा वापर करण्यात आला आहे.(आज सकाळी आठ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार)

राज्येकेंद्रशासित प्रदेशांसह खाजगी रुग्णालयांकडे अद्याप 2.11 कोटींपेक्षा जास्त (2,11,93,241) लसींच्या मात्रा शिल्लक आहेत.

ऊर्जा उपकरणे उत्पादन योजना

ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा उपकरणांसंदर्भात आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमास चालना देण्यासाठी फऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा उपकरणांसाठी उत्पादन क्षेत्रे स्थापन करण्याची योजनाङ्ग प्रस्तावित आहे.

तीन वषार्ंच्या कालावधीत तीन उत्पादन क्षेत्रं उभारण्याचा प्रस्ताव आहे. सामान्य पायाभूत सुविधा (सीआयएफ) आणि सामान्य चाचणी सुविधा (सीटीएफ) स्थापित करण्याच्या उद्देशाने या उत्पादन क्षेत्रांना सहाय्य दिले जाईल. या उत्पादन क्षेत्रांसाठी निवड निकष अद्याप निश्चित झालेले नाहीत.

केंद्रीय ऊर्जा व नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!