ऑॅक्सिजनचा नियंत्रित पुरवठा करणारे, एम्लेक्स हे अशा प्रकारचे पहिले उपकरण आयआयटी रोपारद्वारा विकसित
मुंबई प्रतिनिधी
20 जुलै
वैद्यकीय ऑॅक्सिजनच्या सिलिंडर्सचे आयुष्य तीन पटीने वाढविण्याच्यादृष्टीने , रुग्णांना श्वास घेताना आवश्यक प्रमाणात ऑॅक्सिजन पुरवणारे आणि उश्वासाद्वारे कार्बन डाय ऑॅक्साईड बाहेर सोडत असताना ऑॅक्सिजन पुरवठा रोखणारे अर्थात ऑॅक्सिजनचा नियंत्रित पुरवठा करणारे, एम्लेक्स हे अशा प्रकारचे पहिले उपकरण इंडियन इन्स्टिट्यूट ऑॅफ टेक्नॉलॉजी, रोपार ने विकसित केले आहे. या प्रक्रियेमुळे ऑॅक्सिजनची बचत होते.
आतापर्यंत, श्वासोच्छवासाच्या दरम्यान, ऑॅक्सिजन सिलेंडर पाईपमधील ऑॅक्सिजन वापरकरता श्वास सोडत असताना कार्बन डाय ऑॅक्साईड सोबत बाहेर ढकलला जात असे. यामुळे दीर्घ कालावधीत मोठ्या प्रमाणात ऑॅक्सिजनचा अपव्यय होत असे. कोविड -19 च्या दुसर्?या लाटेच्या वेळी आपण पाहिले आहे,की वैद्यकीय ऑॅक्सिजनची मागणी अनेक पटींनी वाढली होती. या उपकरणामुळे या ऑॅक्सिजनचे अशा प्रकारे अनावश्यक रितीने मोफत जाणे थांबविण्यास मदत होईल.
आयआयटी रोपार येथील जैववैद्यकीय अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. आशिष सहानी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या जैववैद्यकीय अभियांत्रिकी विभागाच्या पीएचडीचे विद्यार्थी मोहित कुमार, रविंद्र कुमार आणि अमनप्रीत चंदर यांनी हे उपकरण विकसित केले आहे.
यासंदर्भात बोलताना डॉ. सहानी म्हणाले,फविशेष करून ऑॅक्सिजन सिलिंडरसाठीच तयार केलेले, एएमएलएक्स सहजपणे ऑॅक्सिजन पुरवठ्याची लाइन आणि रूग्णाच्या तोंडावरील मास्क याच्याशी जोडले जाऊ शकते. यात सेन्सर चा वापर करण्यात आला असून तो सेन्सर कोणत्याही पर्यावरणीय स्थितीत वापरकर्त्याचा श्वास आणि उच्छवास यातील फरक यशस्वीरित्या ओळखू शकते,ङ्ग. हे साधन व्यावसायिकरित्या उपलब्ध कोणत्याही ऑॅक्सिजन थेरपी आणि मास्क यांच्या बरोबर कार्य करू शकते.
लुधियाना येथील दयानंद वैद्यकीय महाविद्यालयाच्या संशोधन आणि विकास विभागाचे संचालक डॉ. जीएस वांडेर ,या उपक्रमाचे कौतुक करतांना म्हणाले, की अनेक रुग्णालये ऑॅक्सिजनची उत्पादन क्षमता वाढवत असले तरी, अशा उपकरणामुळे ग-ामीण आणि निमशहरी छोट्या वैद्यकीय केंद्रांमधील ऑॅक्सिजनचा वापर नियंत्रित करण्यास मोठी मदत होऊ शकते.