भारतीय युवा लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी मायगव्हतर्फे ऑॅनलाईन स्पर्धेचे आयोजन

मुंबई प्रतिनिधी

20 जुलै

तरुणांचे सक्षमीकरण आणि भविष्यात नेतृत्व भूमिकेसाठी तरुण विद्यार्थ्यांना प्रेरित करणारी एक शैक्षणिक परिसंस्था निर्माण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत मायगव्ह व्यासपीठ हे शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) सहकार्याने, युवा लेखकांसाठी पंतप्रधानांच्या मार्गदर्शन योजनेंतर्गत जगभरातील तरुण आणि इच्छुक भारतीय लेखकांच्या सहभागासाठी ऑॅनलाईन स्पर्धेचे आयोजन करीत आहे. ऑॅनलाइन स्पर्धा 4 जून 2021 रोजी सुरू करण्यात आली होती आणि ती 31 जुलै 2021 पर्यंत खुली आहे.

युवा ची मुख्य वैशिष्ट्ये (तरुण, उदयोन्मुख आणि अष्टपैलू लेखक)

अखिल भारतीय स्पर्धेच्या माध्यमातून एकूण 75 लेखकांची निवड केली जाईल. एनआयटीने स्थापन केलेल्या समितीमार्फत ही निवड केली जाईल. ही स्पर्धा 4 जून ते 31 जुलै 2021 या कालावधीत चालणार आहे. मार्गदर्शन योजनेंतर्गत नेटके पुस्तक म्हणून विकसित करण्याच्या योग्यतेचा निर्णय घेण्यासाठी स्पर्धकांना 5,000 शब्दांचे हस्तलिखित सादर करण्यास सांगितले जाईल. निवडक लेखकांची नावे 15 ऑॅगस्_ 2021 रोजी जाहीर केली जातील. मार्गदर्शनावर आधारित, निवडलेले लेखक नामनिर्देशित मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम निवडीसाठी हस्तलिखिते तयार करतील. 15 डिसेंबर 2021 पर्यंत विजेत्यांच्या नोंदी प्रकाशनासाठी सज्ज ठेवल्या जातील. प्रकाशित पुस्तकांचे उदघाटन 12 जानेवारी 2022 रोजी युवा दिनी किंवा राष्ट्रीय युवा दिनी होऊ शकते. ही स्पर्धा 1 जून 2021 रोजी 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या भारतीय नागरिकांसाठी खुली आहे. भारताबाहेर राहणारे पीआयओ कार्ड (भारतीय वंशाची व्यक्ती) धारक भारतीय नागरिक किंवा भारतीय पासपोर्ट धारक एनआरआय (अनिवासी भारतीय) देखील या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. मार्गदर्शक योजनेंतर्गत प्रत्येक लेखकाला दरमहा 50,000 रुपये यानुसार सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एकत्रित शिष्यवृत्ती देण्यात येईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!