अश्लील व्हिडिओ प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्राचे हे जुनं टिवट होतंय व्हायरलं
मुंबई प्रतिनिधी
20 जुलै
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याचं 9 वर्षापूर्वीचं टिवट आता व्हायरल होत आहे. ईल चित्रपटाच्या एका प्रकरणात अटक झाल्यानंतर सोशल मीडियावर हे टिवट व्हायरल झाले आहे.
45 वर्षांच्या राज कुंद्राने या टिवटमध्ये प्रश्न केला होता की, पोर्नोग-ाफी कायदेशीर आहे तर मग वेश्याव्यवसाय का नाही?
ठपोर्न विरुद्ध वेश्या व्यवसाय. एखाद्याला कॅमेर्?यावर लैंगिक संबंधासाठी पैसे देणे कायदेशीर आहे? मग दुसरे कसे वेगळे आहे?‘ ‘राज कुंद्रा याने मार्च 2021 मध्ये हे टिवट केले होते.
ईल कंटेंट प्रकाशित आणि प्रसारित करण्याविरूद्ध देशात कठोर कायदे आहेत, जरी खाजगीपणे ईल साहित्य पाहणे कायदेशीर आहे. वेश्या व्यवसायावरील कायदे अनेक वर्षांपासून अस्पष्ट आहेत. काळानुसार, देशात लैंगिक कामगार आणि त्यांच्या मुलांचे शोषण होऊ नये म्हणून वेश्या व्यवसायाचे कायदेशीररीत्या समर्थन करणारे लोक वाढत आहेत.
पोर्नोग-ाफी प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा याचे निकटवर्तीय रायन थॉर्पेला आज अटक करण्यात आली.
अभिनयाची संधी देण्याचं आश्वासन दिल्यानंतर ईल फिल्म करण्यास भाग पाडल्याबद्दल एका महिलेने गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणात पोलिसांनी श्री कुंद्रा यांना फमुख्य सूत्रधारङ्ग म्हणून संबोधले आणि त्यांच्यावर पुरेसे पुरावे असल्याचे सांगितले.