‘लोकराज्य’चा जुलै महिन्याचा अंक प्रकाशित
मुंबई प्रतिनिधी
दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’चा जुलै महिन्याचा अंक प्रकाशित झाला आहे. राज्यात राबवण्यात येत असलेल्या वनमहोत्सव व वनीकरण कार्यक्रमाबाबतची माहिती देणारा विशेष लेख या अंकात समाविष्ट आहे. तसेच अहिंसा आणि लोककल्याण या तत्त्वांचा जागर करणाऱ्या श्रीचक्रधरस्वामी यांच्या अवतारकार्याला 800 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याची ओळख सर्वसामान्यांना व्हावी, नव्या पिढीने त्यांचे तत्वज्ञान समजून घ्यावे, यासाठी विशेष लेखांचा विभाग हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे.
या अंकात पर्यावरण विभाग राबवत असलेल्या विविध योजना, कोरोनामुक्त गाव मोहीम, बीडचा पिकविम्याचा पॅटर्न, कुलाळवाडीची वैशिष्ट्यपूर्ण शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना इत्यादी माहितीच्या लेखांचा तसेच शेतीतील नव्या प्रयोगांनी महाराष्ट्र अधिक समृद्ध होत असून ‘विकेल ते पिकेल’ या योजनेच्या यशकथांचाही समावेश करण्यात आला आहे. महत्त्वपूर्ण घडामोडी व मंत्रिमंडळ निर्णयांचा थोडक्यात आढावाही या अंकात घेण्यात आला आहे. हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.