सोन्याच्या दरात आजही घट

मुंबई प्रतिनिधी

19 जुलै

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर अस्थिर आहेत. तरी देखील सोन्याची मागणी कमी झालेली नाही. लग्न सराई आणि सण जवळ आल्यामुळे सोने धातूच्या मागणीत वाढ झाली आहे. आज 100 ग-ॉम सोन्याचे दर 100 रूपयांनी कमी झाले आहेत. तर 10 ग-ॉम सोन्याचे दर 10 रूपयांनी कमी झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्यासाठी जवळपास 47 हजार 200 रूपये मोजावे लागत आहेत. ही माहिती गोल्ड रिटर्न वेबसाईटने दिली आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचे दर

शहर 22 कॅरेट 24 कॅरेट

मुंबई 47 हजार 190 48 हजार 190

दिल्ली 47 हजार 400 51 हजार 400

चेन्नई 45 हजार 410 49 हजार 540

कोलकाता 47 हजार 20 48 हजार 460

तज्ज्ञांच्या मतानुसार 2021 वर्षाअखेर सोन्याचे दर 60 हजार रूपयांचा आकडा पार करू शकतात. म्हणजे जर तुम्ही सहा महिन्यांमध्ये सोने या मैल्यवान धातूत पैसे गुंतवल्यास फायदा नक्कीचं होईल. येत्या काळात सोन्याचे तर गेल्या वर्षीचा रेकॉर्ड मोडू शकतात. सोन्याच्या गुंतवणुकीबद्दल सांगायचं झालं तर गेल्या वर्षी सोन्याने 28 टक्के रिटर्न्स दिलं.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!