एचडीएफसी बँकेने पहिल्या तिमाहीत 16.1 टक्के शुद्ध लाभ मिळाला

मुंबई प्रतिनिधी

17जुलै

एचडीएफसी बँकेने शनिवारी आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीमध्ये आपला शुध्द नफ्यात दरवर्षाच्या आधारावर 16.1 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात 30 जून2021 ला समाप्त तिमाहीमध्ये समीक्षाधीन तिमाहीच्या दरम्यान बँकेचा शुध्द नफा वाढून 7,729.6 कोटी रुपये झाला आहे.

या व्यतिरीक्त बँकेचा शुध्द व्याज उत्पन्न (उत्पन्न अर्जित कमी व्याज खर्च) 30 जून 2021 ला समाप्त तिमाहीसाठी 15,665.4 कोटी रुपयांवरुन वाढून 17,009.0 कोटी रुपये झाला आहे.

बॅकेनुसार तिमाहीच्या दरम्यान देशात कोविड-19 ची दुसरी लाट सुरु होती यामुळे विविध उत्परिवर्ती (म्युटेंट) कोरोना विषाणू स्ट्रेन आढळून आल्यानंतर रुग्णसंख्येत उल्लेखनीय वाढ झाली होती. मात्र शेवटी सुधार झाला होता. तिमाहीच्या जवळपास दोन तितृयांश कालावधीत तर व्यवसायीक हालचालींवर अकुंश लावण्यात आला होता.

प्रसिध्द निवेदनानुसार या कोरोना विषाणू संकटाच्या कारणामुळे किरकोळ कर्जाची उत्पत्ती, तिसर्‍या पक्षाच्या उत्पादनाची विक्री, कार्ड खर्च आणि संग-ह प्रयत्नांमध्ये दक्षतांमध्ये कमी आली. कमी व्यापारांचे प्रमाण, उच्च घसरणीसह कमी महसूला बरोबरच तरतुदीचे एक वाढलेला स्तरही पाहिला मिळाला.

बँकेनुसार समीक्षाधीन तिमाहीसाठी तरतुद आणि आकस्मिकतां 30जून 2021 ला समाप्त तिमाहीसाठी 3,891.5 कोटी रुपयावरुन 4,830.8 कोटी रुपये झाली होती. वर्तमान तिमाहीसाठी एकूण तरतुदीमध्ये जवळपास 600 कोटी रुपयांच्या आकस्मिक तरतुद सामिल आहे. या व्यतिरीक्त बँकेने सांगितले की या वर्षी 30 जून 2021 ला समाप्त तिमाहीमध्ये बँकचे सकल गैरनिष्पादीत आस्तियां (एनपीए) अनुपात वाढून 1.47 टक्के झाले आहे जे एक वर्षापूर्वी याच कालावधीत 1.36 टक्के आणि मार्च तिमाहीत 1.32 टक्के होते.  30जून 2021 पर्यंत शुध्द गैर-निष्पादीत संपत्ती शुध्द अगि-मांचे 0.48 टक्के होते.

एचडीएफसी बँकेनुसार बँकेने 30जून 2021 ला 1,451 कोटी रुपयांच्या अस्थायी तरतुदी आणि 6,596 कोटी रुपयांच्या आकस्मिक तरतुदी ठेवल्या होत्या. एकूण तरतुद 30जून 2021 ला सकल गैरनिष्पादीत कर्जाचे 1.46 टक्के होते.

समेकित परिणामांच्या संदर्भात 30जून 2021 ला समाप्त तिमाहीमध्ये बँकेचा शुध्द नफा 14.4 टक्क्याने वाढून 7,922 कोटी रुपये झाला. समेकित अगि-म 30जून 2021 ला 10,53,683 कोटी रुपयावरुन 13.7 टक्क्याने वाढून 30जून 2021ला 11,97,876 कोटी रुपये झाला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!