’…त्यांनी वडिलांप्रमाणे भूमिका निभावली’, शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरुन कौतुक

मुंबई प्रतिनिधी

15 जुलै

कोरोनाच्या काळात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे.’एका वडिलांप्रमाणे त्यांनी भूमिका निभावली आहे’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

आज सह्याद्री अतिथीगृहात ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ’महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र : वस्तुस्थिती, संधी आणि दिशा’ या विषयावर बैठक पार पडली. यावेळी उपमख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादा भूसे, परिवहन मंत्री अनिल परब यांची उपस्थितीत होती. राज्यातील विविध प्रश्नांवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर दादा भूसे यांनी माहिती दिली.

’मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात उत्तम काम केलं आहे. एका वडिलांप्रमाणे त्यांनी भूमिका निभावली आहे. त्यामुळे ते लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहे, असं कौतुकही शरद पवार यांनी केल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं.

या बैठकीनंतर शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा या शासकीय निवास्थानी पोहोचले होते. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 30 मिनिटं चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा तपशील मात्र समोर येऊ शकला नाही.

काय आहे सर्व्हे!

’प्रेश्नम नं भारतातील विविध राज्यांसाठी मुख्यमंत्री त्रैमासिक मान्यता रेटिंग सुरू केली आहे. या सर्वेक्षणानुसार असं समोर आलं की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

सर्वेक्षणात जवळपास 49 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली असल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा उद्धव ठाकरेंना मतदान करणार असल्याचं काही मतदारांनी सांगितलं. या यादीत उद्धव ठाकरे अव्वल आहेत. त्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना 44 टक्के पसंती मिळाली आहे. तिसर्‍या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आहेत. राज्यातील सर्वेक्षण झालेल्या 40 टक्के मतदारांनी त्यांच्या कामगिरीला मान्यता दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!