जेईई मेन्सच्या चौथ्या सेशनच्या परीक्षेच्या तारखा जाहीर
मुंबई प्रतिनिधी
15 जुलै
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने घेण्यात येणार्या जेईई मेन्सच्या चौथ्या सेशनसाठीच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्रक जारी करण्यात आले आहेत. शिक्षणमंत्री धर्मेंर्द्र प्रधान यांनी टवीट करत ही माहिती दिली आहे. तसेच चौथ्या सेशनच्या तारखांमध्ये थोडा बदल करण्यात आला असून त्या आता 26 जुलै, 27 जुलै, 31 ऑॅगस्ट, 1 सप्टेंबरआणि 2 सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार आहे.जेईई मेन्सच्या चौथ्या सेशनसाठीचे ऑॅनलाईन नोंदणी प्रक्रिया 20 जुलैपर्यंत सुरु आहे
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जेईई मेन्स परीक्षा फेब-ुवारी,मार्च, एप्रिल, मे या चार सेशनमध्ये घेण्याचा निर्णय झाला होता. त्यापैकी फेब-ुवारी आणि मार्च महिन्यातील परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. एप्रिल आणि मे महिन्याच्या म्हणजेच तिसर्या आणि चौथ्या सेशनच्या परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता या परीक्षा जुलै आणि ऑॅगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना यावर्षी जेईई मेन्स 2021 परीक्षेसाठी चार संधी देण्यात आल्या आहेत. ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त होतील त्या परीक्षेचे गुण ग-ाह्य धरले जाणार आहेत.
या वर्षी विद्यार्थ्यांना अर्ज भरताना आपल्या सोयीनुसार परीक्षा केंद्र निवडण्याची संधी देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी सध्याच्या स्थितीत खबरदारी म्हणून परीक्षा केंद्राची संख्या सुद्धा पूर्वीपेक्षा दुप्पटीने वाढवली आहे. जेणेकरून कोरोनासंबंधी सोशल डिस्टनसिंग व इतर नियमांचे काटोकोरपणे पालन होईल याची खबरदारी सुद्धा घेण्यात आली आहे.