इंधन दरवाढ विरोधी आंदोलनात सहभागी होऊन वाहनचालकांनी निषेध नोंदवावा!
मुंबई प्रतिनिधी
15 जुलै
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव कमी होऊन देखील, भारतात मात्र ’केंद्रातील मोदी सरकार’ त्यावर जाचक व जूलमी करवाढ आकारून ’पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅस’ ची जावघेणी दरवाढ करू लूट करत आहे. या अन्यायकारक ’दरवाढीचा निषेध’ करण्यासाठी वाहन चालकांनी देखील आपल्या वाहनांवर दरवाढीच्या निषेधाचे स्टिकर लावून केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज टिळक भवन, मुंबई येथे केले.
युपीए सरकारच्या काळातील व मोदी सरकारच्या काळातील कच्च्या तेलाचे व पेट्रोल डिझेलच्या दरांमधील फरक दाखवणारे स्टिकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी तयार केले आहेत त्याचे प्रकाशन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. संजय जगताप, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम पांडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामकिशन ओझा, यशवंत हाप्पे , प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रमोद मोरे, पृथ्वीराज पाटील, धनश्याम निम्हण, संजय अभंग आदी उपस्थित होते.