पुन्हा इंधन दरवाढ; आतापर्यंत 21 रूपयांनी वाढले दर
मुंबई प्रतिनिधी
15 जुलै
जुलै महिन्यात सलग आठवेळा इंधन दरवाढ नोंदवण्यात आली आहे. देशातील 4 मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 101 रूपयांवर पोहोचले आहे. इंधन दरवाढीचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. देशात सर्वात जास्त दर राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये आहे. याठिकाणी 1 लिटर पेट्रोलसाठी तब्बल 112.90 रूपये मोजावे लागत आहेत. तर डिझेल जवळपास 103.15 रूपये लिटरने मीळत आहे.
4 मेट्रो शहरांमधील पेट्रोलचे दर
शहर कालचे दर आजचे दर
दिल्ली 101.19 101.54
मुंबई 107.20 107.54
कोलकाता 101.35 101.74
चेन्नई 101.92 102.33
4 मेट्रो शहरांमधील डिझेलचे दर
शहर कालचे दर आजचे दर
दिल्ली 89.72 89.87
मुंबई 97.29 97.45
कोलकाता 92.81 93.02
चेन्नई 94.24 94.39
सांगायचं झालं तर महाराष्ट्रात देखली पेट्रोल डिझेलच्या दरांनी 100 रूपयांचा आकडा पार केला आहे.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमधील पेर्टोलचे दर…
शहर पेट्रोल
अकोला 107.17 रूपये
अमरावती 108.24 रूपये
जळगाव 107.60 रूपये
नागपूर 107.29 रूपये
परभणी 109.80 रूपये
पुणे 106.88 रूपये
ठाणे 107.05 रूपये