महाराष्ट्रात ’कबड्डी महर्षी’ शंकरराव साळवींचा जन्मदिवस कबड्डी दिन म्हणून साजरा

मुंबई प्रतिनिधी

15 जुलै

मातीत खेळला जाणारा रांगडा कबड्डी दिवस आज साजरा केला जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरात दरवर्षी ’कबड्डी महर्षी’ शंकरराव ऊर्फ बुवा साळवी यांचा जन्मदिवस ‘कबड्डी दिन’ म्हणून साजरा केला जातो. मातीतला हा खेळ खर्‍या अर्थाने ग्लोबल झाला असून अनेक देशात कबड्डी खेळली जाते. भारतात गावोगावी खेळला जाणारा खेळ आंतराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी बुवा साळवी यांनी मेहनत घेतली.

मातीत खेळल्या जाणार्‍या कबड्डीला प्रो-कबड्डीने एक वेगळी ओळख करुन दिली. राज्यातल्या अनेक खेळाडूंना यामुळे राष्ट्रीय पातळीवर एक नवीन ओळख मिळाली, तसचं आर्थिक पाठबळामुळे अनेक खेळाडूंच्या आयुष्यात अमुलाग- बदल झाले आहेत.

कबड्डी हा मुळात दक्षिण आशियातला व आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे. हुतुतू या नावानेही हा खेळ प्रसिद्ध आहे. मूळचा भारतीय असलेला हा खेळ पाकिस्तान, भूतान, नेपाल, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया इत्यादी देशात खेळला जातो. महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांत हुतुतू, कर्नाटक व तामिळनाडूमध्ये चाडू-गुडू, केरळमध्ये वंदिकली, पंजाबमध्ये झबर गगने, तर बंगालमध्ये दो-दो या नावाने हा खेळ खेळला जातो.

1934 मध्ये या खेळाचे नियम तयार झाले. तर 1936 मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांनी या खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन ऑॅलिंपिकमध्ये प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. 1938 पासुन हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला. 1950 मध्ये अखिल भारतीय कबड्डी संघ स्थापन झाला. महाराष्ट्राने जे नियम या खेळाकरिता निश्चित केले होते. त्या नियमानुसार संपूर्ण भारतात कबड्डी हा खेळ खेळाला जाऊ लागला.

भारतातील प्रसिद्ध कबड्डी खेळाडू –

पूर्वी फक्त खुल्या मैदानावर होणारा हा खेळ खेळला जात. मात्र, आता बंदिस्त जागेत व मॅटवरही खेळला जातो. हा खेळ माती मध्ये जास्त प्रमाणात खेळला जातो. अनुप कुमार,परदिप नरवाल,राहुल चौधरी आणि महिलांमधे अभिलाषा म्हात्रे,दिपाली जोसेफ हे प्रसिद्ध कबड्डी खेळाडू आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!