जूनमध्ये घाऊक महागाई दर 12.07म झाला, एलपीजी गॅस 31.44म आणि पेट्रोल 60म टक्क्यांनी महागले

मुंबई प्रतिनिधी

14 जुलै

सरकारने घाऊक महागाईची आकडेवारी बुधवारी जाहीर केली. घाऊक किंमत निर्देशांक जूनमध्ये घसरून 12.07म वर घसरला. सलग पाचव्या महिन्यात तो वाढला आणि मे मध्ये विक्रमी 12.94म झाला होता. त्याच वेळी, जून 2020 मध्ये घाऊक महागाई दर 1.81म झाला होता.

वाणिज्य आणि उद्योगाच्या मते, जूनमध्ये घाऊक महागाई दर 12 टक्क्यांहून अधिक होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे खनिज तेलाची किंमती वाढणे हा आहे. यात पेट्रोल, डिझेल, नेफ्तासह जेट इंधनाचा समावेश आहे. याशिवाय मूलभूत धातू, खाद्यपदार्थ यासारख्या फूड प्रोडक्टचेही भाव वाढले आहेत.

जाहीर केलेल्या अहवालानुसार, वार्षिक आधारावर इंधन आणि पावर सर्वात जास्त 32.83म महाग झाले. त्याचप्रमाणे मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्टसही 10.88 टक्क्यांनी महाग झाली आहेत. जूनमध्ये प्रायमरी आर्टिकल 7.74 टक्क्यांनी महाग झाल्या आहेत. तसेच खाण्यापिण्याच्या वस्तू स्वस्त झाल्याने फूड इंडेक्समध्ये महागाई दर 6.66म वर आला आहे, जो मे महिन्यात 8.11म वर होता.

सरकारने यापूर्वी सोमवारी रिटेल महागाई आणि इंडस्ट्रियल आउटपूटची आकडे जारी केले होते. कंज्यूमर प्राइस इंडेक्स (ण्झ्घ्) आधारित रिटेल महागाई दर जूनमध्ये कमी होऊन 6.26म राहिला, जो मेमध्ये 6.30म होता. मेमध्ये महागाई दराचा हा आकडा गेल्या 6 महिन्यात सर्वात जास्त राहिला. इंडस्ट्रियल आउटपूविषयी बोलायचे झाले तर वार्षिक आधारावर हे 29.2म वाढले, जो मे 2020 मध्ये 33.4म घसरला होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!