भोसरी जमीन खरेदी प्रकरण; झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ
मुंबई प्रतिनिधी
13 जुलै
पुण्यातील भोसरी जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या झोटींग समितीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. हा अहवाल गहाळ झाल्याने राज्यभर एकच खळबळ उडाली आहे.
भोसरी जमीन खरेदी संदर्भात चौकशीसाठी झोटिंग समिती नेमण्यात आली होती. या अहवालात एकनाथ खडसे यांना झोटिंग समितीने क्लीन चिट दिली होती. झोटिंग समितीचा अहवाल ईडीकडे सादर करावयाचा होता. मात्र अहवाल मिळाला नाही तर, खडसेंच्या अडचणीत वाढ होणार आहे. विशेष म्हणजे, खडसे यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर तत्कालिन देवेंद्र फडणीवस यांच्या सरकारने ही समिती नेमली होती आणि आणि समितीने या प्रकरणात खडसेंना क्लिनचीट दिली होती.