खनिकर्म निविदा प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई, दि. 2 : खनिकर्म महामंडळातील निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी नागपूरच्या विभागीय आयुक्तांची एकसदस्यीय समिती गठित करण्यात आली असून या समितीला एक महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.

आ. नाना पटोले यांनी नागपूर खनिकर्म महामंडळ व महाजनको  यांच्यादरम्यान कोळसा पुरवठा व स्वच्छ करण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची श्री. देसाई यांनी  तात्काळ दखल घेऊन उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह यांना पुढील कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार शासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांची एकसदस्यीय समिती गठित केली आहे. या समितील एक महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या संदर्भातील शासन आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

दरम्यान, महाजनको आणि नागपूर खनिकर्म महामंडळ यांच्यात ही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. प्रक्रियेशी राज्य शासनाचा थेट संबंध नसल्याचे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!