राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. 26 : सामाजिक क्रांतीचे थोर उद्गाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास राज्य विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी राज्य विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव रविंद्र जगदाळे, मा. सभापती, विधानपरिषद यांचे सचिव महेंद्र काज, विधिमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी महेश चिमट यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!