ब्रह्मपुरी येथील अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्याकरिता नगरविकास विभागाने क्रीडा विभागास जागा हस्तांतरित केल्यास सुविधा उपलब्ध करुन देणार क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांची माहिती

मुंबई, दि. २३ : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे अद्ययावत क्रीडा संकुल  उभारण्यासाठी नगरविकास विभागाने प्रस्तावित जागा क्रीडा विभागास तत्काळ हस्तांतरित केल्यास विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुका क्रीडा संकुलातसाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती होती. क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह  क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होती.

मंत्री श्री.केदार म्हणाले, नवीन प्रस्तावित जागा जी खेळासाठी राखीव आहे ती नगरपरिषद, ब्रम्हपुरीकडे हस्तांतरीत व्हावी व त्याठिकाणी नगरपरिषद मार्फत नगर क्रीडा संकुल उभारता येईल. सदर कामासाठी लागणारा निधी रु.२०.१६ कोटी विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करुन घेवून क्रीडा संकुल बांधकाम पूर्ण करता येईल.

बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे चंद्रपूर पालकमंत्री विजय वडट्टीवार म्हणाले, तालुका क्रीडा संकुल, ब्रम्हपुरी येथे सद्यस्थितीत असलेली जागा अद्यावत क्रीडा सुविधांच्या विस्तारीकरणा करिता अपूरी असल्याने माझ्या निर्देशानुसार तालुका क्रीडा संकुलाचे विस्तारीकरिता अंतर्गत मौजा बोंडेगांव येथील भुमापन क्रमांक ४०५ मधील ४.८५ हे. आर जागा खेळाचे मैदानाकरीता राखीव ठेवण्यात आलेली आहे. सदरच्या जागेवर अद्ययावत क्रीडा सुविधा निर्मिती करणे शक्य होणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!