आर्यन खानने जेलमध्ये खर्च केलेत ’इतके’ रुपये
मुंबई
क्रूझ ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने टाकण्यात आलेल्या धाडीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. आता 26 दिवसांनी आर्यन खान याची आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली आहे. यावेळी आर्यन खानने जेलमध्ये एकूण 5 हजार 250 रुपये खर्च केले आहे. आर्यनला त्याच्या वडिलांकडून 15 हजार रुपयांची मनीऑॅर्डर देण्यात आली होते.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणांमध्ये बॉलिवूडचा शहेनशहा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर झाल्यानंतर काल त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पडली. मात्र जामिनाची प्रत तुरुंगात वेळेवर पोहोचली नसल्यानं आर्यनला रात्र तुरुंगात काढावी लागली. त्यानंतर आज 30 ऑॅक्टोबर 2021 आर्यन खानची कारागृहातून सुटका झाली आहे. कारागृहातून सुटका होण्यापूर्वी आर्यन खानला तुरुंग प्रशासनाकडून काही पैसे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आर्थर रोड कारागृहाच्या अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुरुंगातून बाहेर येण्यापूर्वी आर्यन खान याला तुरुंग प्रशासनाने 9 हजार 750 रुपये परत केले आहेत. आर्यन खानने आर्थर रोड जेलमध्ये एकूण पाच हजार अडीचशे रुपये खर्च केले.
तुरुंगातून बाहेर येण्यापूर्वी तुरुंग प्रशासनाने उरलेल्या रक्कमेची मोजणी करुन आर्यनला 9 हजार 750 रुपये परत केले. तुरुंगात असताना आर्यन खाल याला त्याच्या कुटुंबीयांकडून 15 हजार रुपये मनीऑॅर्डर देण्यात आली होती. कारागृहातील कूपन सिस्टम बंद झाली आहे. त्यामुळे सध्या कोणत्याही कैद्याला त्याच्या कुटुंबाच्या वतीने फक्त मनी ऑॅर्डर केली जाते. या मनी ऑॅर्डरद्वारे मिळालेल्या पैशातून कोणताही कैदी कारागृहात असलेल्या कॅन्टीनमध्ये त्याच्या आवडीचे जेवण खाऊ शकतो. 26 दिवसांनी आर्यन कारागृहातून बाहेर 2 ऑॅक्टोबर रोजी क्रूझवर एनसीबीने कारवाई करत ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आली होती. गुरुवारी आर्यन खानला जामीन मंजूर झाला. मात्र जामिनाची प्रत तुरुंगात वेळेवर पोहोचली नसल्यानं आर्यनला रात्र तुरुंगात काढावी लागली. आज पहाटे 5.30 वाजता आर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून जामीन पत्रपेटी उघडण्यात आली. त्यानंतर सकाळी 11 च्या सुमारास आर्यन कारागृहातून बाहेर पडला.
नेमकं प्रकरण काय?
मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑॅक्टोबर रोजी कार्डेलिया जहाजावर धाड टाकली होती. यावेळी जहाजावर रेव्ह पार्टी सुरु असल्याचे उघडकीस आलं होतं. या ठिकाणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खान हा सध्या जेलमध्ये आहे. मात्र, त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. एनसीबी अधिकार्यांनी आर्यनचे व्हाटसअ?ॅप चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचंदेखील नाव आहे. आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचं एनसीबी अधिकार्यांच म्हणणं आहे. या दोघांतील व्हाटसअ?ॅप संवाद एनसीबी अधिकार्यांनी कोर्टात सादर केला होता. त्यामुळे आर्यनला जामीन मिळण्यास अडचण झाली.
आर्यन खान कैदी नंबर – 956
मुंबई ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानची चर्चा सगळीकडे चर्चा सुरू आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खान आणि गौरी खान सध्या आर्यनमुळे चिंतेत आहेत. आर्यनला आर्थर रोड येथील तुरूंगात ठेवण्यात आले आहे. त्याचा कैदी नंबर र्956 आहे. आर्यनला 20 ऑॅक्टोबरपर्यंत तुरूंगात राहावे लागणार आहे. त्यानंतर त्याच्या जामीनावर निर्णय होणार आहे. काल त्याच्या जामीनाची सुनावणी पूर्व झाली. न्यायाधीशांनी 20 ऑॅक्टोबर पर्यंत निकाल राखून ठेवला आहे.
आर्यनला मनी ऑॅर्डर
जेलमध्ये 11 ऑॅक्टोबरला आर्यन खानला साडे चार हजार रुपयांचं मनी ऑॅर्डर आली आहे. आर्यनला हे पैसे त्याचे वडील म्हणजेच अभिनेता शाहरुख खानने पाठवले आहेत. मनी ऑॅर्डरने आलेल्या या पैशांचा वापर आर्यन कॅन्टीनमधील जेवणासाठी करु शकतो. तसेच तुरुंगातील नियमांनुसार कैदींना पैसे हे फक्त मनी ऑॅर्डरने पाठवले जाऊ शकतात आणि त्यासाठी 4 हजार 500 रुपये ही जास्तीत जास्त रक्कम आहे. तसेच ही रक्कम महिन्यातून एकदाच पाठवता येते. त्यामुळे कोणत्याही कैदीचे घरचे याहून जास्त पैसे मनी ऑॅर्डरद्वारे पाठवू शकत नाही.
जवळपास साडेतीन वाजता जारी केले आदेश –
क्रूझ ड्रग प्रकरणी बॉम्बे हायकोर्टाच्या वतीनं आर्यन खान, मॉडल मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट यांचा जामीन रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आज हायकोर्टाच्या वतीनं जवळपास साडेतीन वाजता ऑॅर्डर जारी करण्यात आले. आर्यनच्या सुटकेचे आदेश जारी करत हायकोर्टानं म्हटलं की, त्यांना एक लाख रुपयाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तत्सम रकमेचे एक किंवा दोन जामीन भरल्यावर सोडण्यात येईल.
जामीन दिला, पण काही अटी कायम –
जामीन देण्यासोबतच उच्च न्यायालयानं आर्यन खानला काही अटीं आणि नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. अटींनुसार, उच्च न्यायालयानं आर्यन खानला इतर कोणत्याही आरोपीसोबत संपर्क साधता येणार नाही. याव्यतिरिक्त स्पेशल कोर्टाच्या कारवाईला कोणत्याही प्रकारे अडथळे निर्माण होतील, असं काहीही आर्यन खाननं करु नये. तसेच जामीन अर्ज मंजूर करताना उच्च न्यायालयानं आर्यन खानला आपला पासपोर्ट स्पेशल कोर्टात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
अन्यथा जामीन रद्द होणार –
जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान, म्हटलं गेलं की, आर्यन खान उच्च न्यायालयानंच्या परवानगीशिवाय देश सोडू शकत नाही. या दरम्यान, उच्च न्यायालयानं हेदेखील म्हटलं की, आर्यन खान जर मुंबईतूनही बाहेर जाणार असेल तर याबाबतची माहिती त्यानं या प्रकरणाशी संबंधित अधिकार्यांना आधीच देणं आवश्यक आहे. या दरम्यान, उच्च न्यायालयानं हेदेखील म्हटलं की, जर आर्यन खाननं अटी मान्य करुन त्यांचं पालन केलं नाही, तर मात्र त्याचा जामीन रद्द होऊ शकतो.