वो 26 दिन! क्रूझ पार्टी ते सुटका; असे होते आर्यन खानचे 26 दिवस!

मुंबई

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी 26 दिवस कोठडीत काढल्यानंतर आज शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ची सुटका होणार आहे. काही तासांत आर्यन खानची आर्थर रोड कारागृहातून सुटका होणार आहे. आणि त्याला घेण्यासाठी स्वत: शाहरुख खान मन्नत बंगल्यावरुन निघाला आहे. साधारणत: सकाळी 10 ते दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान सुटका होऊ शकते अशी माहिती आर्थर रोडच्या कारागृह अधिकार्‍यांनी दिली आहे. मन्नतवरुन निघालेला शाहरुख वाटेतल्या एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये थांबला असल्याचं कळतंय. त्याच्यासोबत वकील देखील असल्याचं समजतंय. तर तिकडे आर्थर रोड कारागृहाबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यासोबतच मन्नतबाहेर शाहरुख खानचे चाहते दाखल झाले आहेत. आर्यनच्या स्वागतासाठी त्यांच्याकडून घोषणाही देण्यात येत आहेत.

किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खान आज आर्थर रोड कारागृहातून बाहेर येणार आहे. परवा आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर काल त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पडली. पण जामिनाची प्रत तुरुंगात वेळेत पोहचली नाही म्हणनू आर्यनची कालची रात्र तुरुंगातच गेली. आज पहाटे 5.30 वाजताच आर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून जामीन पत्रपेटी उघडण्यात आली. त्यामुळे आता आर्यनच्या जामिनासाठीच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर सकाळी 8-9 वाजता आर्यनचा तुरुंगवास संपण्याची शक्यता आहे. सकाळी 8-9 दरम्यान आर्यन त्याचं घर मन्नत बंगल्याकडे रवाना होईल असं कळतंय.

आर्यन खानला अटक झाल्यापासून संपूर्ण घटनाक्रम :

 आर्यन खान क्रूझ पार्टी ड्रग्ज प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम

 2 ऑॅक्टोबरच्या शनिवारी मुंबई क्रुझ टर्मिनलवरील कोर्डिलिया क्रुझवर धाड

 3 ऑॅक्टोबरला रविवारी आर्यनला अटक आणि सुटटीकालीन न्यायालयाकडून 4 ऑॅक्टोबरपर्यंत पहिली कोठडी

 4 ऑॅक्टोबरला पुढील तपासासाठी आर्यनला एनसीबी 7 ऑॅक्टोबरपर्यंत कोठडी

 7 ऑॅक्टोबरला मुख्य महानगरदंडाधिकारी न्यायालयाकडून आर्यनला न्यायालयीन कोठडी

 आर्यन आर्थर रोड कारागृहात, कोरोनानियमावलीनुसार आठवड्याभरासाठी विलगीकरण कक्षात

 न्यायालयीन कोठडी मिळताच आर्यनकडून जामिनाची याचिका

 8 ऑॅक्टोबरला जामीनावर सुनावणी झाली, मात्र एनसीबीकडून आक्षेप

 मुख्य महानगदंडाधिकारी न्यायालयाने जामीन फेटाळला

 11 ऑॅक्टोबरला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयात जामीनासाठी अर्ज

एनसीबीने उत्तर देण्यासाठी मागितला आठवड्याचा अवधी, मात्र बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश

12 ऑॅक्टोबर काहीही कारवाई नाही

13 ऑॅक्टोबर जामीनावर सुनावणी, एनसीबीकडून तीव- विरोध

एनडीपीएस कायद्यातील कलम 29 नुसार अश्या कटात सामील असणं हा एक गंभीर गुन्हा आहे. एएसजी अनिल सिंह यांची न्यायालयात माहिती

14 ऑॅक्टोबरला जामीनावरील सुनावणी पूर्ण न्या. वी.वी. पाटील यांनी निकाल राखून ठेवला.

15 ते 19 ऑॅक्टोबरपर्यंत सणासुदीच्यानित्ताने न्यायालय बंद.

आर्यनचा कारागृहातील मुक्काम वाढला

20 ऑॅक्टोबरला न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.

26 ऑॅक्टोबरला उच्च न्यायालयात सुनावणी सुरू.

27 ऑॅक्टोबरला आर्यन, अरबाज, मुनमुनचा युक्तिवाद पूर्ण.

28 ऑॅक्टोबरला न्यायमूर्ती सांबरे यांच्याकडून अखेर जामीन मंजूर.

29 ऑॅक्टोबर दुपारी 3 वाजता हायकोर्टाकडनं निकालाची प्रत उपलब्ध

4:30 च्या सुमारास जुही चावला हमीदार म्हणून कोर्टात हजर

6:45 वाजता कोर्टाची प्रक्रिया पूर्ण, आर्यनची सीलबंद रीलिज ऑॅर्डर जारी

30 ऑॅक्टोबर पहाटे 5:30 वाजता रिलिज ऑॅर्डर आर्थर रोडच्या जामीन पेटीतून काढली

30 ऑॅक्टोबर : अखेर आर्यन खानची जामीनावर सुटका

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!