अखेर 26 दिवसांनी आर्यन खानची सुटका! किंग खानच्या चाहत्यांचा जल्लोष

मुंबई

क्रूझ पार्टी प्रकरणी अटक झाल्यानंतर, 26 दिवसांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची अखेर जामीनावर सुटका झाली. आर्थर रोड कारागृहाबाहेर शाहरुख खान आपल्या लेकाला घेण्यासाठी आला होता. शाहरुख खान सोबत वकिलही उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. आर्थर रोड कारागृहाबाहेर शाहरुख खानच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. तसेच, आर्यनच्या स्वागतासाठी मन्नतही सज्ज झालं आहे. मन्नतला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मन्नतबाहेरही चाहत्यांची मोठी गर्दी झाली आहे. आर्यनच्या स्वागतासाठी त्यांच्याकडून घोषणाही देण्यात येत आहेत.

गुरुवारी आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर काल त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पडली. पण जामिनाची प्रत तुरुंगात वेळेत पोहचली नाही म्हणनू आर्यनची कालची रात्र तुरुंगातच गेली. आज पहाटे 5.30 वाजताच आर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून जामीन पत्रपेटी उघडण्यात आली. त्यामुळे आता आर्यनच्या जामिनासाठीच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर आज सकाळी आर्यनचा तुरुंगवास संपला.

आर्यन खानसाठी जुही चावला जामीनदार

किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खान आज आर्थर रोड कारागृहातून बाहेर आला. गुरुवारी आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर काल त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पडली. पण जामिनाची प्रत तुरुंगात वेळेत पोहचली नाही म्हणनू आर्यनची कालची रात्रही तुरुंगातच गेली. आज पहाटे 5.30 वाजताच आर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून जामीन पत्रपेटी उघडण्यात आली. आर्यन खानसाठी अभिनेत्री जुही चावला जामीनदार राहिली आहे. त्यानंतर इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेर आर्यनची सुटका झाली.

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी अटकेत असणार्‍या आर्यन खानला गुरुवारी जामीन मंजूर झाला. ड्रग्स प्रकरणी अडकलेला आर्यन खानची आज कारागृहातून सुटका झाली. दोन दिवसांपूर्वी जामीन मिळूनही आर्यनची कारागृहातून सुटका झालेली नव्हती. आर्यन खानला कालची रात्र तुरुंगातच घालवावी लागली होती. आर्यन खानच्या सुटकेबाबत आर्थर रोड जेल प्रशासननं म्हटलं होतं की, का दिवसभरात शेवटच्या वेळी जामीन अर्जाची पेटी उघडण्याच्या वेळापर्यंत आर्यन खानची कागदपत्र पोहोचले नव्हते, त्यामुळे आर्यनची सुटका होऊ शकली नव्हती. जेल प्रशासनानं म्हटलं की, नियमांनुसार ठरलेल्या वेळेप्रमाणे जामीनाचे कागद पोहोचले नव्हते. त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला.

क्रूझ ड्रग प्रकरणी बॉम्बे हायकोर्टाच्या वतीनं आर्यन खान, मॉडल मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट यांचा जामीन रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आज हायकोर्टाच्या वतीनं जवळपास साडेतीन वाजता ऑॅर्डर जारी करण्यात आले. आर्यनच्या सुटकेचे आदेश जारी करत हायकोर्टानं म्हटलं की, त्यांना एक लाख रुपयाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तत्सम रकमेचे एक किंवा दोन जामीन भरल्यावर सोडण्यात येईल.

जामीन दिला, पण काही अटी कायम

जामीन देण्यासोबतच उच्च न्यायालयानं आर्यन खानला काही अटीं आणि नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. अटींनुसार, उच्च न्यायालयानं आर्यन खानला इतर कोणत्याही आरोपीसोबत संपर्क साधता येणार नाही. याव्यतिरिक्त स्पेशल कोर्टाच्या कारवाईला कोणत्याही प्रकारे अडथळे निर्माण होतील, असं काहीही आर्यन खाननं करु नये. तसेच जामीन अर्ज मंजूर करताना उच्च न्यायालयानं आर्यन खानला आपला पासपोर्ट स्पेशल कोर्टात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान, म्हटलं गेलं की, आर्यन खान उच्च न्यायालयानंच्या परवानगीशिवाय देश सोडू शकत नाही. या दरम्यान, उच्च न्यायालयानं हेदेखील म्हटलं की, आर्यन खान जर मुंबईतूनही बाहेर जाणार असेल तर याबाबतची माहिती त्यानं या प्रकरणाशी संबंधित अधिकार्‍यांना आधीच देणं आवश्यक आहे. या दरम्यान, उच्च न्यायालयानं हेदेखील म्हटलं की, जर आर्यन खाननं अटी मान्य करुन त्यांचं पालन केलं नाही, तर मात्र त्याचा जामीन रद्द होऊ शकतो.

आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खानच्या चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. शाहरुख खानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमा झाली होती. शाहरुखच्या फॅन्सनी त्यांच्या घराबाहेर येत आनंद साजरा केला. मीडियाने जारी केलेल्या व्हिडीओनुसार, शाहरुख खानचा लहान मुलगा अबराम आनंदी असून तो घराबाहेर जमलेल्या लोकांना अभिवादन करत होता.

दरम्यान, मुंबईहून गोव्याला जाणार्‍या कॉर्डिलिया या आलिशान क्रुझवर एनसीबीने 2 ऑॅक्टोबरला धाड टाकली होती. यावेळी ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा आणि अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. आर्यनसह अरबाज आणि मूनमून धमेचाच्या वतीनं मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली.

ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, मॉडेल मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. आर्यन खानला अटक केल्यानंतर 26 व्या दिवशी जामीन मिळाला. सध्या त्यांची सुटका होण्यासाठी एक ते दोन दिवस लागतील. मात्र, याबाबत अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दुसरीकडे आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी फोटो शेअर केला असून या फोटोमध्ये शाहरुख खान हसताना दिसत आहे.

आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे म्हणाले, ‘आर्यन शाहरुख खानला अखेर हायकोर्टातून जामीन मिळाला आहे. 2 ऑॅक्टोबर रोजी अटकेच्या पहिल्या दिवसापासून या प्रकरणात कोणताही पुरावा नाही, कोणताही उपभोग नाही, कोणताही कट नाही. आणि आता काहीही नाही. .‘ आमची प्रार्थना न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी मान्य करून आर्यनला जामीन मंजूर केल्याचे वकिलांनी सांगितले.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला एनसीबीने 2 ऑॅक्टोबर रोजी मुंबई किनार्?यावरील एका क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर अटक करण्यात आली होती. न्यायमूर्ती एन डब्ल्यू सांबरे यांच्या एकल खंडपीठाने या प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही जामीन मंजूर केला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!