क्रांती रेडकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, नवाब मलिक म्हणाले ’मी रेडकर ताईंना सागू इच्छितो की… ’

मुंबई,

नवाब मलिकांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केला आहे. यासोबतच समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर भाष्य करत नवाब मलिकांनी काही प्रश्न विचारले आहेत. कुटुंबीयांना गोवलं जात असल्याचा समीर वानखेडेंचा आरोप चुकीचा आहे. मी धर्माचं राजकारण करत नाही. लढाई कुटुंबीय किंवा धर्माविरोधात नाहीये तर अन्यायाविरोधात आहे. मी समीर वानखेडेंच्या आईवर किंवा पत्नीवर कुठलाही आरोप केला नाही. मी क्रांती रडकरचं नाव कधीही घेतलं नाही असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राला बदनाम करुन उत्तरप्रदेशात नेत यूपीवूड बनवण्याचा प्रयत्न आहे. हे त्यांचं स्वप्न स्वप्नच राहील. मी रेडकर ताईंना सागू इच्छितो की, रेडकर ताई तुमचे पती अशा षडयंत्राचा भाग आहेत जे महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. आम्हाला वाटतं की महाराष्ट्राच्या नावावर तुम्ही जे काही करत आहात त्यात तुम्हाला कोणतीही मदत मिळणार नाही.

नवाब मलिक पुढे म्हणाले, क्रांती रेडकरयांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं की, ’आम्ही मराठी आहोत आणि मराठी असल्याने आम्हाला मदत करा.’ नवाब मलिकांचा परिवार ही 70 वर्षांपासून महाराष्ट्रात आहे. नवाब मलिक याच राज्याचा एक नागरिक आहे. नवाब मलिक महाराष्ट्राचा नाहीये का? नवाब मलिकांनी पुढे म्हटलं, पण ज्यापद्धतीने पूर्ण भाजप यांच्यापाठी उभी राहिली आहे. सोमय्यांसोबत त्यांचा फोटोही व्हायरल झाला आहे. जी माझी शंका होती की जो भूत आहे त्याचे प्राण याच पोपटात आहेत आणि पोपट आता पिंजर्‍यात बंद होणार आहे त्यामुळे पूर्ण राक्षसी विचाराचे लोक घाबरू लागलेत. जर पोपट पिंजर्‍यात अडकला तर पूर्ण राज खुले होतील का?

समीर वानखेडे यांच्यामागे भाजपचे नेते उभे राहिले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला बदनाम करण्याचं षडयंत्र वानखेडेंच्या माध्यमातून केला जात आहे हे मी आधीपासूनच सांगत आहे. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न वानखेडेंकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे असा आरोपही नवाब मलिकांनी केला आहे.

नवाब मलिकांनी म्हटलं, मी जबाबदारीने सांगतो, काही भाजपचे नेते समीर वानखेडेला भेटतात आणि कालपासून त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. काशिफ खान हा कोन आहे याची जरा माहिती काढा. तो सेक्स रॅकेट, ड्रग्ज रॅकेट चालवतो आणि त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. रेव्ह पार्टी होणार हे माहिती असतानाही कारवाई नाही, क्रूझवर झाडाझडती नाही म्हणजे त्यांचे संबंध आहेत. काशिफ खानला अटक झाल्यावर अनेकांच्या चेहरे उघडे पडतील. काशिफ खानच्या माध्यमातून काय काय सुरू आहेत हे त्याची कसून चौकशी झाल्यावर उघड होईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!