हुतात्मा, सिद्धेश्वर एक्सप्रेस 17 गाड्या आजपासून धावणार

मुंबई,

सोलापूर विभागातील दौंड-कुर्डूवाडी सेक्शनमधील भाळवणी ते वाशिंबे स्थानकादरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी सिद्धेश्वर, हुतात्मा एक्सप्रेससह अन्य 15 एक्सप्रेस गाड्या आजपासून सुरू होणार आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर महत्त्वाच्या गाड्या सुरू झाल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. भाळवणी ते वाशिंबे दरम्यान (26.33 किलोमीटर) रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी मागील दोन महिन्यापांसून काही गाड्या बंद तर काही गांड्याचा मार्ग बदलण्यात आला होता. हे काम पूर्ण झाल्यामुळे आता पुन्हा एकदा हुतात्मा ,सिद्धेश्वर एक्सप्रेसह अन्य गाड्या धावणार आहेत.

भाळवणी ते वाशिंबे या स्थानकादरम्यान सुरु असलेलं दुहेरीकरणाचं काम 25 ऑॅक्टोबर रोजी पूर्ण झालं. कामांसोबत सिग्नलच्या यंत्रणेची पाहणी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज आरोरा यांनी केली. त्यांनंतर मागील दोन-तीन महिन्यांपासून बंद असलेल्या सर्व गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला.

या गाड्या पूर्ववत होणार –

01139 मुंबई-गदग विशेष एक्सप्रेस

01140 गदग-मुंबई विशेष एक्सप्रेस

02116 सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस

02115 मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस

02207 मुंबई-लातूर विशेष एक्सप्रेस

02208 लातूर-मुंबई विशेष एक्सप्रेस

 02043 मुंबई-बिदर विशेष एक्सप्रेस

 02044 बिदर-मुंबई विशेष एक्सप्रेस

06237 म्हैसूर-साईनगर शिर्डी विशेष एक्सप्रेस

06238 साईनगर शिर्डी-म्हैसूर विशेष एक्सप्रेस

07614 नांदेड-पनवेल विशेष एक्सप्रेस

07613 पनवेल-नांदेड विशेष एक्सप्रेस

07014 हैद्राबाद-हडपसर विशेष एक्सप्रेस

07013 बिदर-मुंबई विशेष एक्सप्रेस

मुंबई-बिदर विशेष एक्सप्रेस

0115701158 पुणे-सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेस

मार्ग परिवर्तन (बदल) करण्यात आलेल्या एक्?सप्रेस गाड्या आपल्या निर्धारित स्थानकावरून धावतील

सांगोला-आर्दशनगर (दिल्ली) किसान रेल्वे

सांगोला-मुजफ्फरपूर किसान रेल्वे

सांगोला-शालिमार किसान रेल्वे

लोकमान्य टिळक टर्मिनस-मदुराई

मदुराई- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्?सप्रेस

भुनेश्वर-पुणे एक्?सप्रेस

पुणे-भुनेश्वर एक्?सप्रेस

नागरकोईल-मुंबई एक्?सप्रेस

मुंबई- नागरकोईल एक्?सप्रेस

नागरकोईल-मुंबई एक्?सप्रेस

मुंबई- नागरकोईल एक्?सप्रेस

विशाखापट्टणम-एलटीटी एक्?सप्रेस

एलटीटी-विशाखापट्टणम एक्?सप्रेस

म्हैसूर-वाराणसी एक्?सप्रेस

वाराणसी- म्हैसूर एक्?सप्रेस

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!