राष्ट्रवादी बिनभरवशाची, काँग-ेसमध्ये दरोडेखोर नाहीत – चंद्रकांत पाटील

मुंबई,

एसटी कर्मचार्‍यांची आंदोलनाची धग पुन्हा वाढली आहे. कृती समितीने घेतलेली भूमिका मान्य नाही, असं म्हणत सोलापुरात एसटी कर्मचार्‍यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं. या आंदोलनकर्त्या एसटी कर्मचार्‍यांची भेट भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग-ेसवर निशाणा साधला. तसेच राष्ट्रवादी भाजपसोबत सलगी करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सांगितलं.

राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील सांगलीमध्ये भाजपमध्ये सलगी करत आहेत, या प्रश्नावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ’राष्ट्रवादी हा कधीच भरवशाचा पक्ष नाही. सकाळी एक राजकारण, दुपारी एक राजकारण आणि संध्याकाळी एक राजकारण. एकवेळ काँग-ेस परडवली. काँग-ेसमधील सर्व व्यक्तीमत्व वेल कल्चर असतात. दरोडेखोर नसतात. राष्ट्रवादीनं सलगी करणं याला राष्ट्रवादी कधीचं भूलणार नाही. राष्ट्रवादी भाजपसोबत करत असलेल्या डावाला भाजप फसणार नाही.’

राष्ट्रवादी जवळ येऊ पाहतेय, पण आम्ही त्यांना जवळ येऊ देणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. सोलापुरातील एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारला. आंदोलनकर्त्या एसटी कर्मचार्‍यांशी चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

दरम्यान, प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचार्‍यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं शस्त्र उपसलं आहे. गुरुवारी बैठकीत तोडगा निघाला असं सांगितलं होतं मात्र अनेक ठिकाणी आजही कर्मचार्‍यांचं आंदोलन सुरु आहे. कृती समिती शासनासोबत डील करतेय, असा आरोप करत आंदोलन पुकारण्यात आलं आहे. गुरुवारी एस टी कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 12 वरून 28 टक्क्यांवर वाढवण्यात आला, तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ केलेली. मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी संघटनांची मंत्रालयात बैठक झाली त्यात काही मागण्या मान्य करण्यात आल्या. तर उर्वरीत मागण्यांबाबत दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याचं मंत्री अनिल परब यांनी सांगितलं होतं. तरीही कर्मचार्‍यांनी आंदोलन पुकारलं आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!