रायगड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदांवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीस स्थगिती
मुंबई, दि. 28 :
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडील नवीन अधिनियमाप्रमाणे राज्य ग्राहक संरक्षण परिषद तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेबाबत नियम तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे त्यामुळे अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात सध्या स्थगिती देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी, रायगड यांच्याकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर २८ अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड यांच्या कार्यक्षेत्रातील 15 तालुक्यांतील अर्ज 18 नोव्हेंबर 2021 पर्यंत मागविण्यात आले होते. त्यानुसार कालबध्द कार्यक्रम प्रसिध्द करण्यात आला होता. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडील नवीन अधिनियमाप्रमाणे राज्य ग्राहक संरक्षण परिषद तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेबाबत नियम तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे.
नवीन नियम अंतिम झाल्यानंतर राज्य ग्राक संरक्षण परिषद व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची रचना अधिसूचीत करण्यात येईल. तरी नवीन नियम अंतिम झाल्यानंतरच नवीन अशासकीय सदस्यांच्या निवडीबाबतची पुढील कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीस शासनाकडील पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात येत आहे, असे पत्रकाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड यांनी कळविले आहे.