खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राअंतर्गत सायकलिंग खेळाच्या निवड प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन

मुंबई,

आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया निपुणता केंद्र अंतर्गत सायकलिंग या खेळाची निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून निपुणता चाचणीमध्ये खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन मुंबई उपनगर, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

जिल्हास्तरावर 2 मुले आणि 2 मुलींची निवड करण्यात येणार आहे. यासाठी एकूण गुणानुक्रमे प्रथम आलेले 2 मुली आणि 2 मुले यांना राज्यस्तर निवडचाचणी करिता पाठविण्यात येणार आहे. राज्यस्तर निवडीसाठी जे खेळाडू सायकलिंग या खेळात राज्य व राष्ट्रीयस्तरावर सहभाग झालेले आहेत व ज्या खेळाडूंची जन्मतारीख जानेवारी 2007 ते 2009 दरम्यान आहे. अशा खेळाडूंना थेट राज्यस्तरावर जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांच्यामार्फत चाचणीस उपस्थित राहता येईल.

 जिल्हास्तर निवड चाचणी दि 09 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी ठीक 8.00 वा. भारतीय खेळ प्राधिकरण कांदिवली येथील ट्रॅकवर घेण्यात येईल. चाचणीकरीता इच्छुक खेळाडू यांनी आपली संपूर्ण माहिती पूर्ण नाव, संपर्क क्र. र्वीेाीालरर्ळीील2020ऽसारळश्र.लेा वर दि 03 नोव्हेंबर 2021 पर्यंत ई -मेलद्वारे कळवावी चाचणीसाठी येणार्‍या खेळाडू यांची जन्मतारीख जानेवारी 2007 ते 2009 दरम्यान असावी. ः राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सहभागी झालेले खेळाडू (जन्मतारीख जानेवारी 2007 ते 2009 दरम्यान असावी) यांना राज्यस्तर चाचणीकरिता थेट उपस्थित राहता येणार आहे अशा सर्व खेळाडू यांनी त्यांचे सायकलिंग या खेळाचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सहभाग व क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्र सर्व तपशीलासह माहिती या कार्यालयास दि 03 नोव्हेंबर 2021 पर्यंत ई मेल द्वारे पाठवून निपुणता चाचणीमध्ये खेळाडूनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केलेले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!