समीर वानखेडेंनी 26 बनावट केसेस करत लोकांना फसवलं?, नवाब मलिक यांनी दिला पुरावा
मुंबई
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी एका अज्ञात एनसीबी आधिकार्याकडून मिळालेलं पत्र टिवटर पोस्ट केलं आहे. या चार पानांच्या पत्रात समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. या पत्रात 26 वेगवेगळ्या केसेसबाबतची माहिती आहे. या केसेस ज्यामध्ये लोकांना मुद्दाम अडकवण्यात आलंय अथवा फसवण्यात आलंय याबाबतची माहिती त्या आधिकार्यांनी दिली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना हे पत्र पाठवलं असून एनसीबीच्या महासंचालकांना पाठवण्यात येणार आहे. याची चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. तपासांमध्ये या पत्रातील 26 केसेसचा समावेश करावा, ही विंनती करणार आहे. समीर वानखेडे यांच्याकडून वसूली झाली आहे. मालदीव आणि मुंबईमध्ये वसूली झाली आहे. माझ्या अंदाजानुसार एक हजार कोटींपेक्षा जास्त वसूली झाली आहे. एनसीबीच्या तपासात सर्व सत्य समोर येईल, असे नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं.
गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या क्रूज प्रकरणाचाही 26 केसेसचाही यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये असं म्हटलेय की, ‘केस क्रमांक 942021 मध्ये ण्दी्ाग्त्ग्र क्रूझवरील केसमधील पंचनामे एनसीबी कार्यालयात झाले. भाजपच्या इशार्यावर सर्व कारवाई झाली. दोन जणांच्या मदतीनं समीर वानखेडे यांनी ड्रग्ज पुरावे पेरले. क्रूजवर छउइ कर्मचारी विश्व विजय सिंग, आशीष रंजन किरण बाबू, विशावनाथ तिवारी व सुधाकर शिंदे, ध्ऊण् कदम, शिपाई रेड्डी, पी.डी. मोरे , विष्णू मिना, ड्रायव्हर अनिल माने आणि खासगी सचिव शरद कुमार व अन्य कर्माचार्यांनी आपल्या सामानात लपवून ड्रग्ज नेहले. संधी साधून लोकांच्या सामानात ड्रग्ज लपवले गेले. समीर वानखेडे यांना छापेमारीदरम्यान बॉलिवूड कलाकार, मॉडेल अथवा सेलिब-ेटी मिळाल्यास जबरदस्ती तो ड्रग्ज असल्याचं दाखवून फसवतो अन् केस तयार करतो. समीर गेल्या महिन्याभरापासून भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांसोबत (के. पी गोसावी आणि मनिष भानूशाली) संपर्कात आहेत. क्रूजवर जितक्या लोकांना पकडलं, त्या सर्वांना एनसीबी कार्यालयात आणलं गेलं. सर्व पंचनामे एनसीबीच्या कार्यालयात करण्यात आले. दिल्लीवरुन फोन आल्यानंतर रिशब सचदेव, प्रतीक गाबा आणि अमीर फर्नीचारवाला यांना त्याच रात्री सोडण्यात आलं. याप्रकरणात समीर वानखेडे यांची कॉल डिटेल्स चेक करु शकता. या प्रकरणात आरबाज मर्चंट याचा मित्र अब्दुलजवळ ड्रग्ज मिळालं नव्हतं. पण समीर वानखेडे यांनी ड्रग्जची खोटी केस केली. समीर वानखेडे यांनी या प्रकरणात आपला वाहन चालक विजय याला पंच केलं आहे. नियमांनुसार, साक्षीदार स्वतंत्र असायला हवा. हे सर्व प्रकरण बनावट आहे. या प्रकरणात मिळालेलं ड्रग्ज समीर वानखेडे यांनी पेरलेलं आहे.‘
पाहूयात काय आहेत आरोप
1) समीर वानखेडे यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत चार प्रमाणिक एनसीबी आधिकार्यांना निलंबीत केलं.
2) राकेश अस्थाना यांच्या सांगण्यावरुन समीर वानखेडे यांनी बॉलिवूडला टार्गेट केलं. कोट्यवधी रुपये वसूल केले. वकील अयाज खान यांच्यामार्फत पैसे गोळा केले. महनियाला बॉलिवूड कलाकारांकडून वसूली केली जाते. या कलाकारांमध्ये दीपिका पादुकोण, करिश्मा प्रकाश, श्रद्धा कपूर, रकूल प्रीत सिंह, सारा अली खान, भारती सिंह, हर्ष लिम्बाचिया, रिया चक्रवर्ती, सोविक चक्रवर्ती व अर्जुन रामपाल यांचा समावेश आहे.
3) समीर वानखेडे वसूली अधिकारी आहे. प्रसारमाध्यमात राहण त्याला आवडतं. त्यासाठी तो निर्दोष लोकांना फसवतो. यासाठी 13 जणांची टीम बनवली आहे.
4) समीर वानखेडे यांच्या मुंबई बदलीप्रकरणामध्ये अमित शाह यांचं कनेक्शनही पत्रात सांगितलेय.
5) पाळलेल्या गुंडाच्या मार्फत ड्रग्ज खरेदी करुन खोट्य केसेस करत आहे. लोकांकडे ड्रग्ज पेरले जात होते. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जात होती.
6) समीर वानखेडे यांनी मुंबईत कार्यभार सांभाळल्यापासून अटक केलेल्या 25 जणांकडून कोर्या पेपरवर सह्या घेतल्या. आपल्या मर्जीने पंचनामा बदलला.
7) समीर वानखेडे यांच्या केबिनमध्ये थोड्याप्रमाणात ड्रग्ज असेल.
8) समीर वानखेडे आपल्या वसूलीतील काही रक्कम वरिष्ठ आधिकार्यालाही देतो.
9) समीर वानखेडे यांनी पकडलेल्या सर्व आरोपींची चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल.
10) महाराष्ट्र सरकारने समीर वाखेडे यांच्यावर तपास समिती नेमावी, सत्य समोर येईल.