बीडीडी पुनर्विकास कामाचा आढावा; गतीने कामे पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश

मुंबई, दि. २६ : 

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची कामे गतीने पूर्ण करण्यात यावेत असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. बीडीडी चाळीच्या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पाचा आज मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथी गृह येथे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बीडीडी चाळीतील पोलिसांच्या सेवा निवासस्थानासह बीडीडी चाळ प्रकल्पाकरिता कर्मचारी अधिकारी यांचे रिक्त पदे भरणे, ई रजिस्ट्रेशन सुविधेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे इत्यादी विषयांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!