67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण; पाहा विजेत्यांची यादी
मुंबई,
67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा आज वितरण सोहळा पार पडला आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. हिंदी चित्रपटांच्या विभागात अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या ’छिछोरे’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच कंगना रनौतला दोन चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
कंगनाला ’मणिकर्णिका’ आणि ’पंगा’ या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले . तसेच अक्षय कुमारच्या केसरी या चित्रपटातील ’तेरी मिट्टी’ या गाण्याचे पार्श्वगायक बी प्राक यांना या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुपर स्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले. रजनीकांत यांनी याबद्दल टवीट करत चाहत्यांना माहिती दिली होती. रजनीकांत यांनी टवीट करत सरकारचे आभार मानले होते. 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या निर्णायक मंडळाने 22 मार्च 2021 रोजी विजेत्यांची घोषणा केली होती. आज सकाळी 11 वाजता विज्ञान भवनमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला.
सुभाष घई यांचा मराठी चित्रपट ’विजेता’ पुन्हा प्रदर्शनासाठी सज्ज; सुबोध भावे महत्वाच्या भूमिकेत
सिक्किमला चित्रपटांसाठी अनुकूल राज्य म्हणजेच (मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट) या पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘मरक्कर-अराबिक्कदालिन्ते-सिम्हम’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा पुस्कार प्रदान करण्यात आला. आनंदी गोपाळ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आले. अभिनेता धनुष आणि मनोज बाजपेयी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार प्रादन करण्यात आला असून ‘महर्षि’ हा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.