वाहन खरेदी करणार्यांसाठी मोठी बातमी, यासाठीची आरटीओतील पायपीट थांबणार
मुंबई
वाहन खरेदी करणार्यांसाठी कामाची बातमी. तुम्ही गाडी घेत असाल तर नोंदणीसाठी आता तुम्हाला ींऊध् कार्यालयात जाण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्ही घरबसल्या गाडीची नोंदणी करु शकता. ऑॅनलाईन पद्धतीने तुम्ही जुन्या वाहन खरेदीनंतरची नोंदणी करु शकता. तशी सुविधा ींऊध् ने उपलब्ध करुन दिली आहे.
आता जुन्या दुचाकी, चारचाकी वाहन खरेदीनंतरची नोंदणीही ऑॅनलाईन करणे सहज शक्य आहे. तसेच घरबसल्या नवे आरसीबुक मिळणार आहे. गाडी ज्या ठिकाणी खरेदी केली त्या शोरुममध्ये ही सेवा मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांची आरटीओतील पायपीट थांबणार आहे. वाहन खरेदीनतंरची नोंदणी आता घरबसल्या ऑॅनलाईन करता येणार आहे. जुन्या चारचाकी, दुचाकी गाड्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.
ऑॅनलाईन लर्निंग लायसन्सच्या धर्तीवर जुन्यावाहन खरेदीची नोंदणी करता येणार आहे. परिवहन खात्याने या सुविधेसाठी संकेतस्थळावर आवश्यक बदल करण्याची सूचना एनआयसीला दिल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांची आरटीओ कार्यालयातील पायपीट थांबणार आहे. आरटीओ कार्यालयातील दलालांनाही याचा दणका बसणार आहे.