अनन्या पांडेच्या व्हाटसअप चॅटमधील ’त्या दोन’ स्टार किडच्या शोधात एनसीबी

मुंबई,

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला आता एक नवं वळण लागलं आहे. चौकशीदरम्यान एनसीबीला अनन्या आणि सध्या तुरुंगात असलेला आर्यन खान या दोघांचे काही चॅटस सापडले आहेत. यासंदर्भात एनसीबीने काल आणखी एका ड्रग्ज पेडलर काल रात्री अटक केली. आता आणखी दोन स्टार किड एनसीबीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आर्यन – अनन्याच्या चॅटनुसार, अनन्या पांडेनेच आर्यन खानला ड्रग्स पुरवले आहेत का? याचा तपास एनसीबी करत आहे. अद्याप एनसीबीकडे या चॅट व्यतिरिक्त ठोस असा पुरावा लागील. याचा तपास एनसीबी (र्‍ण्ँ) करत आहे. या प्रकरणात अनन्या पांडेसह आणखी दोन स्टार किडचा समावेश असल्याचं देखील सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

ज्या चॅटसची माहिती देत एनसीबीने अनन्या पांडेला चौकशी करता बोलावलं, त्यामधून अतिशय धक्कादायक खुलासा समोर आला आहे. चॅटमध्ये आर्यन खान आणि अनन्या पांडे गांजाबद्दल बोलताना दिसत आहेत. हे संभाषण या दोघांमध्येच झालं आहे. त्यामुळे आता अनन्या पांडेच्या संकटात वाढ होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

आर्यन खान, अनन्या पांडेला विचारतोय गांजा मिळेल का? यावर अनन्याच उत्तर होतं ती व्यवस्था करेल. या चॅटमधून धक्कादायक खुलासा झाला आहे. यामुळे अनन्या पांडे यामध्ये अडकणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी जेव्हा अनन्या पांडेला या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अनन्या म्हणाली, की ती आर्यन खानसोबत विनोद करत होती. र्‍ण्ँ च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यतिरिक्त, त्यांच्या अशा अनेक गप्पा आहेत ज्यात दोघे वेगवेगळ्या प्रसंगी मादक पदार्थांबद्दल बोलत आहेत.

असे सांगितले जात आहे, की आर्यन-अनन्याच्या या गप्पांमध्ये नशेबद्दल संभाषण होते. या चॅटनंतर एनसीबी ऍक्शनमध्ये आले आहे. या प्रकरणातील चॅट सुनावणी दरम्यान न्यायालयाला देण्यात आली. गुरुवारी अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात पोहोचली. त्यावेळी तिच्यासोबत वडील चंकी पांडे होते.

बॉलिवूड अभिनेत्रीसोबत आर्यन चा व्हाँटसअप चॅट

आजच्या सुनावणीपूर्वी या प्रकरणात आणखी एक खुलासा झाला आहे. मीडिया रिपोटर्सनुसार, एनसीबीच्या हाती आर्यन खानचे काही चॅटस लागले आहेत. क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी आर्यन खानसोबत बॉलिवूडची एक नवखी अभिनेत्रीचे चॅट एनसीबीच्या हाती लागले आहेत. चॅटसमध्ये अभिनेत्रीसोबत आर्यन खानची अमंली पदार्थांबाबत चर्चा झाली होती. कोर्टात सुनावणी दरम्यान एनसीबीनं ज्या आरोपींचे चॅटस सादर केले होते. त्यामध्ये आर्यन खानसह या अभिनेत्रीच्याही चॅटसचा समावेश आहे.

कधी झाली अटक?

आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीने 2 ऑॅक्टोबर रोजी गोव्याला जाणार्‍या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती, तर उर्वरित पाच इतर आरोपींना दुसर्‍या दिवशी अटक करण्यात आली होती. रिमांड कालावधी संपल्यानंतर आरोपींना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर एम नेर्लीकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. येथून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अद्यापही तो आर्थर रोड जेलमध्येच असून 30 ऑॅक्टोबरपर्यंत त्याला कोठडी मिळाली आहे. दरम्यान आर्यनच्या सुटकेसाठी खान कुटुंबीय शर्थीची न्यायालयीन लढाई लढत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!