‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर वृषाली राऊत यांची मुलाखत
मुंबई, दि. २२-
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित “दिलखुलास या कार्यक्रमात ‘कामगारांचे मानसिक आरोग्य‘ या विषयावर वृषाली राऊत यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘ न्यूज ऑन एअर‘ या अॅपवरून सोमवार दि. २५, मंगळवार दि. २६ आणि बुधवार दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
कामाच्या ठिकाणचे मानसिक आरोग्य म्हणजे काय, मानसिक आरोग्याचा व कामाच्या गुणवत्तेचा कामाशी संबंध, भारतात मानसिक आरोग्याच्या बाबतीत नेमकी स्थिती, कामगारांचे मानसिक आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने उपाययोजना, आरोग्य व त्याचे प्रकार, नोकरी व व्यवसायाशी संबंधित मानसिक आरोग्य, वर्क फॉम होमचा मानसिक आरोग्यावर झालेला परिणाम, वेल बिईंग ही संकल्पना आदी विषयांची सविस्तर माहिती श्रीमती राऊत यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.