आर्यन खानचे व्हॉटसअॅप चॅट न्यायालयात सादर, ड्रग्जशी संबंध असल्याचा एनसीबी चा दावा
मुंबई
आर्यन खान याचे व्हॉटसअप चॅट कोर्टात सादर केल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. पोलिसांना आर्यन खान याच्या व्हाँटसअप चॅटमध्ये कथीतरित्या ड्रग्जशी संबंधीत काही पुरावे सापडले आहेत. तो एका अभिनेत्रीशी बोलताना हे चॅट झाले असल्याचा एनसीबीचा दावा आहे.
आज पुन्हा एकदा आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. यामुळे आर्यन खानला जामीन मिळणार की हे पहावं लागणार आहे. मात्र आर्यन खानला अडचणीत आणणारा आणखी एक पुरावा एनसीबीने कोर्टासमोर सादर केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेल्या आहे.
आर्यन खानला क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणी 2 ऑॅक्टोबरला अटक करण्यात आली असून सध्या तो जेलमध्ये आहे. आर्यनच्या जामिनावर सुनावणी करणार्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने गेल्या सुनावणीत जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान एनसीबीने जामीनाच्या सुनावणीआधी आर्यन खानने एका अभिनेत्रीसोबत ड्रग्जसंबंधी चॅटिंग केल्याची माहिती कोर्टात दिली आहे. एनसीबीने हे संभाषण कोर्टात सादर केलं आहे. गेल्या सुनावणीत एनसीबीने कोर्टात ही माहिती दिली आहे. या अभिनेत्री आणि आर्यन खानमध्ये अनेकदा ड्रग्जवरुन चॅटिंग झालं आहे. याआधी एनसीबीने आर्यन खानचं काही ड्रग्ज तस्करांसोबत संभाषण झाल्याचे पुरावे दिले होते.
एनसीबीने आर्यन खानच्या मोबाइलमधील चॅटिंग तपासलं असून याआधीही अनेक संभाषणांचा उल्लेख केला आहे. दरम्यान यावेळी आर्यन खानने एका नवोदित अभिनेत्रीसोबतही ड्रग्जसंबंधी चॅट केलं होतं असं समोर आलं आहे. 2 ऑॅक्टोबरला झालेल्या क्रूझ पार्टीतल्या ड्रग्जसंबंधी दोघांमध्ये बोलणं झालं होतं. याच पार्टीनंतर आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेत नंतर अटकेची कारवाई केली होती. आर्यनच्या जामिनावर सुनावणी करणार्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने गेल्या सुनावणीत जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. आज याप्रकरणी सुनावणी होणार आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट यांच्यासहित एकूण सहा जणांना एनसीबीने 2 ऑॅक्टोबरला छापा टाकून ताब्यात घेतलं होतं. दुसर्या दिवशी त्यांना अटक करण्यात आली होती.