शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; वाचा, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा

मुंबई

राष्ट्रवादी काँग-ेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत वाहतूकदारांच्या समस्या, लॉक डाऊनमधील शिथिलता आणि चित्रपटगृहांच्या प्रश्नांबाबत चर्चा झाल्याचे समजते. सह्याद्री अतिथीगृहात ही भेट झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, दिलीप वळसे पाटील असे महाविकास आघाडी सरकारचे नेते उपस्थित होते.

सर्वांचे लक्ष लागलेल्या बैठकीत वाहतूकदारांच्या समस्या, लॉक डाऊनमधील शिथिलता आणि चित्रपटगृहांच्या प्रश्नांबाबत चर्चा झाल्याचे समजते. आता दुपारी तीन वाजता टास्क फोर्सची बैठक होणार आहे. या बैठकीत याविषयी अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यंत्र्यांनी दिल्याचे समजते आहे. दरम्यान, राज्यातील केंद्रीय तपास यंत्रणांचा वाढलेला हस्तक्षेप, थकीत जीएसटीचा निधी, अतिवृष्टी अशा विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा होण्याची शक्यता यापूर्वी व्यक्त करण्यात आली होती. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबतही रणनिती आखली जाणार असल्याचीही चर्चा होती. त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे संपूर्ण लक्ष लागले होते.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा हस्तक्षेप वाढल्याचे आरोप आघाडीचे नेते करत आहे. अनेक नेत्यांवर सीबीआय, आयटी, इडीमार्फत धाडी आणि छापेमारीचे सत्र सुरू आहे. राष्ट्रवादी काँग-ेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आघाडीतील नेते करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणाकडून त्रास दिला जातोय, असा आरोप पवार यांनी केला. तसेच केंद्राने सरकार पाडण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला होता. पवार मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेणार आहेत. भेटी दरम्यान महापालिका निवडणुकीच्या मुद्द्यांवरही चर्चा होणार असल्याचे समजते. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!