सर्वांना गर्व होईल असे काम करून दाखवणार.. समुपदेशनात आर्यन खानचा एनसीबीला शब्द

मुंबई,

क्रुझ ड्रग प्रकरणात अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान हा सध्या कोठडीत आहे. येथे त्याचे समुपदेशन करण्यात आले असून त्याने एनसीबी आणि सामाजिक संस्थेला आपण चांगला माणूस होईल, तसेच सर्वांना गर्व होईल असे काम करून दाखवणार, असे म्हटल्याची माहिती सुत्रांनी दिली.

ड्रग प्रकरणात एनसीबीकडून अटक करण्यात आलेल्या प्रत्येक आरोपीचे सामाजिक संस्थेच्या मदतीने समुपदेशन करण्यात येते. क्रुझ रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींचे देखील एनसीबी कोठडीत असताना समुपदेशन करण्यात आले असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली.

क्रुझ पार्टी प्रकरणी आर्यन खान आणि त्याच्यासोबत अटक करण्यात आलेले आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे, त्यांचे अमली पदार्थ सेवनाने स्वत:वर व समाजावर होणारे दुष्परिणाम यावर एका सामाजिक संस्था आणि एनसीबीच्या अधिकार्‍यांनी समुपदेशन केले. आर्यन खान याच्या समुपदेशनावेळी स्वत: एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे उपस्थित होते. सामाजिक संस्था आणि एनसीबीने आर्यन खानचे समुपदेशन केले, यावेळी आर्यन खान हा भावूक झाला होता. मी येथून बाहेर पडल्यानंतर चांगला व्यक्ती बनून दाखवेल, चांगली कामे करील, एनसीबीच्या अधिकार्‍यांना गर्व वाटेल असे काम करण्याचा प्रयत्न करेन, असा शब्द आर्यन खानने समुपदेशनावेळी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि सामाजिक संस्थेला दिला, अशी माहिती सुत्रांनी दिली.

एनसीबीकडून अमली पदार्थ प्रकरणात अटक केलेल्या प्रत्येक आरोपीचे सामाजिक संस्थेच्या मदतीने समुपदेशन करण्यात येते. त्यांना अमली पदार्थबाबतचे दुष्परिणाम, समाजावर होणारे परिमाण याबाबतची माहिती देवून त्यांना अमली पदार्थ सेवन करण्यापासून परावृत्त करण्यात येते. आर्यन आणि त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्यांचे देखील समुपदेशन करण्यात आले असल्याची माहिती एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!