हिंदूत्व धोक्यात आहे ते परक्यांपासून नाही तर ह्या नवहिंदूंपासून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई,
दरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा यंदा कोरोना काळात बंद हॉलमध्ये कमी लोकांच्या उपस्थित होत आहे. भाषणाच्या सुरुवातीपासूनच मुख्यमंत्र्यांनी भाजपला लक्ष्य करायला सुरुवात केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हिंदूत्वावरुन राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, भाजप यांच्यावर टीकास्त्र सोडलं. हिंदूत्व धोक्यात आहे ते परक्यांपासुन नाही तर ह्या नवहिंदूंपासुन आहे, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :
हर्षवर्धन पाटलांसारखे लोक भाजपाचे ब-ॅन्ड ?म्बॅसॅडर करुन टाकायला हवे. पहले मुझे नींद नही आती थी, दरवाजे पर टिक टिक हुई तो जग जाता था, फिर मैं भाजपा मे गयों अब मैं कुंभकर्ण की तरह सोता हुँें
अंगावर आलेल्यांना शिंगावर घेऊ. समोरुन वार करा. ईडी, सीबीआयच्या माध्यमातुन नको. जर मला आवाहन द्यायचे असेल तर शिवसैनिकांकरवी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून देईन, मुख्यमंत्री म्हणून नाही.
ज्यांना आजही मुख्यमंत्री असल्यासारख वाटतंय त्यांनी जर वचन पाळलं असतं तर कदाचित तेही मुख्यमंत्री झाले असते. परंतु त्यांच्या नशीबात नव्हतं.
मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन. हे क्षेत्र माझं नाही, शब्द पाळण्यासाही आलो आहे. पण पाय रोवुन उभा आहे.
हिंदुत्व म्हणजे काय? मोहनजी मी तुमच्यावर टीका करतोय असं समजु नका. जर तुम्ही आम्ही जे सांगत आहोत ते जमलेली माणसच ऐकत नसतील तर कशाला ही मेळाव्याची सोंग? आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व!
घराबाहेर पडल्यावर देश हा माझा धर्म. जर या धर्माआड कोणी आल तर कडवट देशाभिमानी म्हणून आम्ही उभे राहु.
सर्वांचे पुर्वज एक होते, आहेत. हे जर आपल्याला मान्य असेल तर विरोधकांचे पूर्वज, आंदोलन करणार्?या शेतकर्?यांचे पूर्वज, लखीमपूरला मारलेल्या शेतकर्?यांचे पूर्वज काय परग-हावरुन आलेले होते का?
लोकशाहीत सर्वात मोठ शस्त्र म्हणजे मत. त्याच्या आधारे तुम्ही रंकाचा राव आणि रावाचा रंक करु शकता. सामान्य जनता सर्वात शक्तीमान आहे.
सत्तेच व्यसन हा देखील एक अंमली प्रकारच आहे. सर्व काही माझ्या अंमलाखाली असावं हे देखील अंमली पदार्थाचे व्यसन!
मी आजही सांगतो, हिंमत असेल तर सरकार पाडुन दाखवा!
छापा काटा खेळ असतो तसा ’छापा’ टाकुन ’काटा’ काढण्याचा प्रकार सुरू आहे. ही थेरं फार काळ चालत नाहीत.
हर हर महादेव म्हणजे काय हे परत एकदा दिल्लीच्या तख्ताला दाखविण्याची वेळ येऊ नये परंतु आलीच तर दाखवावे लागेल.
शिवसेनेवर टीका करायाला तोंडात बोंडख घालुन बसले आहेत ते जर 1992 च्या दंगलीत शिवसेना नसती तर आज दिसले असते का?
हिंदुत्व धोक्यात आहे ते परक्यांपासुन नाही तर ह्या नवहिंदुंपासुन धोक्यात आहे.
मी पूर्वी बोललो होतो की माय मरो आणि गाय जगो हे आमचे हिंदुत्व नाही.
एकमेव मर्द हिंदुहृदयस्र-ाट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एकमेव मर्द तेव्हा उभा होता. धमक्या येत होत्या. परंतु, त्यांनी सांगितलं ज्या रंगाची गोळी आम्हाला चाटुन जाईल तो रंग हिंदुस्थानातुन संपवुन टाकु.
तेव्हा बोलायची यांची हिंमत नव्हती, शेपुट आत घालुन बसले होते, तेव्हा हिंदुहृदयस्र-ाट बोलले होते, ’गर्व से कहो हम हिंदू हैेंं’
हा माझा मर्द शिवसैनिक. अन्य कोणीही तेव्हा समोर नव्हतं. केवळ हा शिवसैनिक आज तुमची पालखी वहात नाही म्हणून भ-ष्टाचारी झाला? शिवसैनिकाचा जन्म देव, देश आणि धर्मासाठी झाला आहे, तुमच्या पालखीचा भोई होण्यासाठी नाही.
गटारीच पाणी तुमच्याकडे टाकलं की गंगा होते?
शब्दभंडार भरपुर आहे माझ्याकडे, आजोबांच आहे आणि वडिलांच तर आहेच आहे. पण माँचे संस्कार आहेत.
पोटनिवडणुकीतही यांच्याकडे उमेदवार नाहीत, उपरे आणावे लागतात. आणि काय तर म्हणे, जगातील सर्वात मोठा पक्ष.
नेहमी मेळावा म्हंटल की वक्त्यांची रांग असते, परंतु आज आम्ही कामे दाखवली.
नवरात्रीच्या पूर्ण नऊ दिवसात ठाणेकरांनी रक्तदानाचा विक्रम केला. कोणत्याही पक्षात ही जाग, ही धमक शिल्लक आहे? हिंदुत्व हे रक्तात असाव लागत. रक्तपिपासु नाही तर रक्तदान हा देखील धर्म आहे.
अन्य पक्षांनी असं विक्रमी शिबिर घेऊन दाखवावं. त्यांच्याकडे रक्त द्यायला सोडा, बॅनर लावायलाही लोक येतात का ते पहा.
राज्यपालांना नम-पणे सांगितले, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, इथे माता-भगिनींचा मान सन्मान राखला जाणार. ज्याने हे केले त्याला तातडीने अटक केली. त्याला फाशी दिल्यावाचुन राहणार नाही.
एखादी घटना घडल्यावर येऊन अश्रु ढाळुन निघुन जायचं असं नको. घटना घडल्यावर काही करायचं यापेक्षा घटना घडुच नये यासाठी आपण देशात काहीतरी करू.
महाराष्ट्राकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. काही झाल की लोकशाहीचा गळा घोटला जातो, मग उत्तरप्रदेशमध्ये काय लोकशाहीचा मळा फुलतो?
26 नोव्हेंबरचा हल्ला. ज्या वेळेस हल्ला झाला तेव्हा जीवाची पर्वा न करता आपले पोलीस आतमध्ये घुसले, त्यांचा आपण सत्कार करायचा की त्यांना अतिरेकी म्हणायचं? जसा सैनिक सीमेवर लढतो तसेच माझा महाराष्ट्राचा पोलीस अतिरेकींशी लढतो. मला त्यांचा अभिमान आहे.
जर माझे पोलीस माफिया तर उत्तरप्रदेशचे पोलीस काय भारतभुषण आहेत?
महाराष्ट्र सत्तेला नाही तर सत्याला जागणारा.
तुमच्या घरी बारा महिने शिमगा असतो. त्याला आम्ही काही करू शकत नाही.
भारतमाता की जय हे मोठ्यान ओरडलं, सैनिकापेक्षा जोरात ओरडलं म्हणजे तो मोठा देशभक्त होतो, हे देशाचे दुर्दैर्व.
कधीतरी आपण वळुन पाहणार की नाही? अमृतमहोत्सव आहे तर अमृतमंथन करा. उहापोह व्हायला हवा, खुलेपणे संघराज्य पद्धतीवर चर्चा व्हायला हवी.
बाबासाहेबांनी ठामपणे सांगितले होते, केंद्राप्रमाणे सर्व राज्ये सार्वभौम राहतील. राज्याला केंद्राप्रमाणेच अधिकार.
मार्मिकमध्ये शिवसेनाप्रमुखांनी सदर सुरू केले होते, ’वाचा आणि थंड बसा’. हे वाचलेले लोकं तुम्ही शिवसेनेची पाळंमुळं आहात. आपल्याच राज्यातील भूमीपुत्रांवर होणार्?या अत्याचारावर हे सदर होते.
सत्ताधारी म्हणून सगळा देश माझा आहे, त्यामुळे हे माझे राज्य आहे, इकडे माझ्या पक्षाचे राज्य आहे म्हणून यांना मी देणार, तिकडे माझ्या पक्षाचे नाही म्हणून तिकडे देणार नाही. हे चालणार नाही.
माहिती अधिकारात प्राप्त माहिती – देशातील बंदरांचा 75 टक्के निधी गुजरातकडे वळवला. वाचा आणि थंड बसा!
संपूर्ण जगात चरस गांजा महाराष्ट्रातच आहे असं चित्र उभ करत आहेत. का करता हा नतद्रष्टपणा? आपली संस्कृती तुळशी वृंदावनाची, पण चित्र उभं केल जात आहे जस सगळीकडे चरस गांजा दारी लावतात.
कोणाला तरी एक सेलेबि-टी घ्यायची, त्याला पकडलं म्हणून फोटो काढायचे, ढोल बडवायचे. पण महाराष्ट्राचे पोलीस जे करत आहेत, त्यावर बोलायचे नाही. एकच बातमी. जामीन झाला का?
महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. कर्तव्य निधी म्हणून 10000 कोटी दिले, मागे देखील नैसर्गिक आपत्तीत 11000 कोटी कर्तव्यबुद्धीने दिले. पण तरीही टीका करत रहायची.
आपण कोविडची लढाई लढतोय ते तुमच्या घामाच्य पैशावर लढतोय. त्यांचा सर्व निधी गेला तिकडे.
आपला देश सर्वात तरुण देश. आपल्याकडे युवाशक्ती मोठी आहे, परंतु त्यांची उर्जा मोठी आहे. मी एका युवाबद्दल नाही तर युवाशक्तीबद्दल बोलतोय. मुल मुली शिकत आहेत, परंत रोजगार कुठे आहेत?
युवा पिढी निट घडवली नाही, तर देशाची घडी बिघडेल. त्यांना वैफल्याशिवाय काय देत आहोत?
आपण महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा, पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्याच वेळेस महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. हे एकतर्फी प्रेमासारखं आहे.
आपण एक भव्य मराठी भवन बनवत आहोत, मुंबईत मराठी रंगभुमी दालन उभ करत आहोत, वरळीला जागतिक मत्स्यालय बनवत आहोत, धारावीमध्ये जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनवत आहोत. त्यांच पुनर्वसन करुच परंतु घर देताना घरात चुल पेटण्याचीही सोय करत आहोत.
लढाई म्हणजे काय? विध्वंस कसा होतो. सैनिक सीमेवर प्रतिकुल परिस्थितीत, मायनस डिग-ी टेम्परेचरमध्ये देखील कसे काम करतात. हे सर्व प्रत्यक्षात अनुभवायला मिळावे. असे दालनही उभ करत आहोत.
मी बंगालचे अभिनंदन केले. ती धमक तुमच्यात आहे? हिंदुत्वाची शिडी करुन जे वर गेले आहेत ते आता इंग-जांच्या ’फोडा आणि राज्य करा’ अशी नीती अंगिकारत आहेत. त्याला बळी जाऊ नका.
मराठी-अमराठी भेद संपवून सर्व हिंदू एकत्र आले पाहिजे.