किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन चित्रा वाघ यांचा रुपाली चाकणकरांवर अप्रत्यक्ष निशाणा

मुंबई,

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रवादी महिला काँग-ेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना दिली जाणार असल्याची चर्चा आहे. रुपाली चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान सध्या यावरुन चांगलेच राजकारण रंगताना दिसत आहे. त्यात आता भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी टिवट केले असून यात त्यांनी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, असे खळबळजनक टिवट केले आहे.

चित्रा वाघ यांनी आपल्या टिवटमध्ये महिलांचे शील भ-ष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणे आहे. अध्यक्ष लवकर नेमावा, पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचेच नाक कापले जाईल, असे म्हटले आहे.

याआधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर होत्या. यानतंर हे पद रिकामे होते. महिलांवरील अत्याचार वाढत असताना अध्यक्षपदी कोणाचीही नेमणूक होत नसल्यामुळे जोरदार टीका होत होती. या पदासाठी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण तसेच माजी सनदी अधिकारी चंद्रा अय्यंगार यांचे नावही चर्चेत होते. पण रुपाली चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!