विद्या बालनच्या ‘शेरनी’ चित्रपटातील दमदार गाणे रिलीज

मुंबई प्रतिनिधी

16 जून

आतापर्यंत अनेक विविध धाटणीच्या भूमिका बॉलिवूडची डर्टी गर्ल अर्थात अभिनेत्री विद्या बालनने साकारल्या आहेत. आपल्या अभिनयाने तिने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता ती पुन्हा एकदा एका नव्या आणि हटके भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येण्याकरिता सज्ज झाली आहे. आता ती शेरनी या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून एका वन अधिकार्‍याच्या भूमिकेत आपल्या समोर येणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी अमेझॉन प्राइमने ‘मैं शेरनी’ हे दमदार गाणे रिलीज केले आहे. यात विद्या बालनसह काही अनोख्या व्यक्तिमत्त्वाच्या स्त्रिया आहेत. या गाण्याच्या माध्यमातून पारंपरिक समजुतींना मोडीत काढून विविध आव्हानांना सामोर्‍या जात आपले स्थान निर्माण करणार्‍या स्त्रियांना सलाम केला आहे.

राघव यांनी लिहिलेले ‘मैं शेरनी’ या गाण्याला उत्कर्ष धोतेकर यांनी संगीत दिले आहे. तर विद्या बालनसोबत या गाण्यात मिरा एर्डा (इ4 रेसर – ड्रायव्हर कोच), नताशा नोएल (बॉडी पॉझिटिव्हिटी इन्फ्ल्युएन्सर – योगा ट्रेनर), एश्ना कुट्टी (सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आणि हुला-हूप डान्सर) दिसत आहेत. तसेच त्रिनेत्रा हलदार (कर्नाटक राज्यातील पहिली ट्रान्सजेंडर डॉक्टर), जयश्री माने (बी.वाय.एल नायर हॉस्पिटलमधील आघाडीची लढवय्यी), रिद्धी आर्या (आघाडीच्या लढवय्यांना पोटभर जेवण पुरवणारी विद्यार्थिनी), अनिता देवी (सुरक्षा रक्षक), सीमा दुग्गल (एक शिक्षिका), अर्चना जाधव (घरकाम करणारी आपली मावशी) दिसणार आहेत.येत्या 18 जून 2021 रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओवर विद्या बालनचा शेरनी हा चित्रपट रिलीज होणार आहे. या गाण्याबाबत बोलताना अभिनेत्री विद्या बालन म्हणाली, कधीही हार न मानण्याची अमर्याद जिद्द बाळगणार्‍या जगभरातील महिलांना आम्ही दिलेली सलामी म्हणजे मैं शेरनी हा म्युझिक व्हिडीओ. आम्हा सर्वांसाठी शेरनी फार खास आहे. आम्ही हा चित्रपट आणि म्युझिक व्हिडीओ यांच्या माध्यमातून अशा महिलांना वंदन करतो, ज्यांनी दाखवून दिले की महिला करू शकणार नाहीत असे काहीच नसते. या चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा विद्या विन्सेटष्ठ यातून आम्हाला दाखवायचे आहे की स्त्री निर्भय असते, ताकदवान असते. वाघीण असण्यासाठी डरकाळीच फोडायलाच हवी, असे काही नाही. आम्ही हेच अँथम बनलेल्या या गाण्यातून दाखवू पाहत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!