भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी मंदाकिनी खडसेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
मुंबई
पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना दिलासा आहे. त्यांना तुर्तास अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने ईडीला दिले आहे. तसेच यादरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी ईडी कार्यालयात हजर राहणे अनिवार्य असून 17 ऑॅक्टोबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत तपासयंत्रणेला सहकार्य करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहे.
काय आहे प्रकरण?
एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी 28 एप्रिल 2016 रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्?र्हे क्र. 522 अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या सर्व व्यवहारात सुमारे 61 कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झाल्याचं सकृतदर्शनी दिसून येत आहे. हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.