दुकानदाराच्या पत्नीकडून केली शरीरसुखाची मागणी; 80 वर्षीय नाईकांची अशी झाली अवस्था
मुंबई,
नवी मुंबईतील 80 वर्षीय वयस्कर व्यक्तीच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. या वृद्धाचा मृतदेह शनिवारी तलावात मिळाला. या प्रकरणात 33 वर्षीय दुकानदाराला अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे मृत वृद्धाचं नाव शमाकांत तुकाराम नाईक असल्याचं सांगितलं जात आहे. वृद्धाच्या हत्येमागील कारण ऐकून लोकही हैराण झाले आहेत. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला आहे.
मृत तुकाराम नाईक यांच्या मुलाने 29 ऑॅगस्ट रोजी वडील बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्यावेळी आरोपी मोहन चौधरी त्याच्यासोबत होता. नाईक कुटुंबांनी सांगितलं की, 29 ऑॅगस्ट रोजी दुपारी ते घरातून निघाले मात्र परत आलेच नाही. त्यानंतर त्यांचा फोनही स्विच ऑॅफ येत होता. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाची सुरुवात प्रॉपर्टी विवाहमध्ये झालेल्या हत्येच्या अँगलने केली. मात्र तपासादरम्यान पोलिसांनी एक सीसीटीव्ही फुटेज पाहिलं आणि अख्ख प्रकरणचं पालटलं. या सीसीटीव्हीमध्ये आरोपी मोहन चौधरी 31 ऑॅगस्ट रोजी आपल्या बाईकवरुन बेडशीटमध्ये लपटून एक मृतदेह घेऊन जात असल्याचं दिसत होता. यानंतर झालेल्या तपासात आरोपीने गुन्हा कबुल केला आहे.
टाइम्स ऑॅफ इंडियामध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार चौकशीत मोहनने सांगितलं की, कोट्यवधींच्या प्रॉपर्टीचे मालक तुकाराम नाईक त्याच्या ग-ॉसरी शॉपमध्ये येत-जात असे. मोहनने सांगितलं की, नाईकने त्याला सुरुवातील 5000 रुपये देण्याचं मान्य केलं होतं. त्याबदल्यात त्याने माझ्या पत्नीसह शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. मी याला नकार दिला तर ते निघून गेले. त्यानंतर काही दिवसांनंतर पुन्हा आले आणि तिच मागणी करू लागले. त्यावेळी मी त्यांना धक्का दिला. त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं तर मी दुकानाचं शटर खाली करीत त्यांची हत्या केली. त्यांचा मृतदेह 31 ऑॅगस्टपर्यंत दुकानाच्या वॉशरुममध्ये ठेवला. त्यानंतर 31 ऑॅगस्ट रोजी सकाळी 5 वाजता त्यांचा मृतदेह बेडशीटमध्ये लपटून बाईकच्या मागे ठेवून तलावात फेकून दिलं. हा सर्व प्रकार जवळील एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्यानंतर आरोपीने सांगितलं की, मृत व्यक्तीचे कपडे आणि मोबाइल फोन एका कचर्याच्या डब्यात फेकून दिलं. अद्याप हे सामान हाती लागलेलं नाही.