डिझेलवरील एक्साईज ड्यूटी आणि व्हॅट कमी करण्याची मागणी, वाहतूकदार संघटनेच्या बैठकीत नाराजीचा सूर
मुंबई,
शंभरी पार डिझेलवर वाहतूकदार संघटनांमध्ये मोठी नाराजी बघायला मिळत आहे. त्याचसोबत डिझेलच्या दरांबाबत चिंता देखील सर्वांकडून व्यक्त केली जात आहे. अशातच वाढत्या डिझेलचा दरांसंदर्भात केंद्र आणि राज्यांनी काही निर्णय घ्यावा म्हणून वाहतूकदार संघटनांकडून आज सकाळी 11 वाजता तातडीची अंतर्गत बैठक बोलवण्यात आली होती. ज्यात डिझेलचे दर कमी करण्यासाठी केंद्रआणि राज्यांना मागणी करणार असल्याची माहिती ऑॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कांग-ेसचे अध्यक्ष आणि कोअर कमिटी मेंबर बलमल्कित सिंह यांनी एबीपी माझाला दिली आहे.
केंद्राकडून डिझेलवर मागील अनेक महिन्यात मोठ्या प्रमाणात एक्साईज ड्युटी वाढवण्यात आली आहे. त्याचसोबत राज्यांनी देखील डिझेलवर मोठ्या प्रमाणात व्हॅट लावला आहे. अशात केंद्रानं डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करावी तसेच सर्व राज्यांनी देखील इंधनावरील व्हॅट कमी करावे, अशी मागणी वाहतूकदार संघटनेकडून करण्यात येणार आहे.
इंधनाच्या वाढत्या दरांसंदर्भात सर्वसामान्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. डिझेलचे दर वाढल्याने वाहतूकदारांना याचा मोठाफटका बसतो आहे. डिझेलचे भाव वाढल्याने वाहतूकदारांच्या भाड्यात देखील वाढ होत असते. अशातच वाहतुकदारांचे देखील नुकसान होत असल्याचे चित्र आहे. सोबतच इंधनदरवाढीचा थेट फटका हा सर्वसामान्यांना देखील बसत असतो. इंधनदरवाढीमुळे महागाईतदेखील वाढ होत असते. त्यामुळे जर डिझेलचे दर नियंत्रणात राहिलेत तर सर्वसामान्यांना देखील याचा दिलासा मिळणार आहे.
ऑॅगस्ट महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक्साईज ड्युटीत कोणतीही सूट मिळणार नसल्याचं सांगितलं होतं. सोबतचपेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणायला महाराष्ट्रासह काही राज्यांचा विरोध आहे. अशातच दुसरीकडे मात्र डिझेल आणिपेट्रोलने शंभरी पार केल्याने सर्वसामान्यांमध्ये मोठी नाराजीची लाट बघायला मिळत आहे.