टी-20 संघाच्या कर्णधारपदासाठी रोहित शर्मा चं नाव पडलं मागे, आता हा युवा खेळाडू प्रबळ दावेदार

मुंबई,

आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 नंतर विराट कोहली टी-20 फॉर्मेटमध्ये टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणारेय. आता प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की कर्णधारपदावर विराटच्या जागी कोणाची वर्णी लागणार आहे.

जेव्हा विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती, तेव्हा टीम इंडियाच्या कर्णधारपदाच्या दावेदारांमध्ये रोहित शर्मा हे सर्वात मोठे नाव होते. पण आता रोहितचं नाव ही मागे पडले आहे.

आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पूर्णपणे अपयशी ठरला. 5 वेळचा चॅम्पियन संघ प्ले ऑॅफमध्येही पोहोचू शकला नाही. ’हिटमॅन’ची बॅटही बहुतांश प्रसंगी गप्प राहिली. रोहितने 13 सामन्यांमध्ये 127.42 च्या स्ट्राईक रेटने 29.30 च्या सरासरीने 381 धावा केल्या, पण त्याने फक्त एक अर्धशतक केले. अनेक वेळा तो सलामीवीर म्हणून त्याच्या संघाला चांगली सुरुवात देऊ शकला नाही, ज्यामुळे श्घ् ला घ्झ्थ् 2021 मधून बाहेर व्हावे लागले.

कर्णधार कोण बनेल?

पुढच्या वर्षी रोहित शर्मा 35 वर्षांचा होईल, त्यामुळे तो टी-20 संघाचा कर्णधार होण्याची शक्यता कमी आहे. बीसीसीआय अशा खेळाडूच्या शोधात आहे जो कर्णधारपदाची जबाबदारी दीर्घकाळ सांभाळू शकेल, त्यामुळे ॠषभ पंतचं नाव पुढे येत आहे. पंतच्या आधी श्रेयस अय्यरचं नाव चर्चेत होतं. पण दुखापतीमुळे त्याला मोठा फटका बसला.

ॠषभ पंत कर्णधारपदाचा दावेदार

ॠषभ पंतला या वर्षी दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद देण्यात आले आणि त्याने ही जबाबदारी अतिशय उत्तमरित्या पार पाडली आणि आपल्या संघाला आयपीएल 2021 च्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर नेले. त्याची वैयक्तिक कामगिरी देखील काही काळासाठी प्रभावी आहे. अशा स्थितीत पंत टी-20 मध्ये टीम इंडियाचा कर्णधार झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!