टी20 क्रिकेटमध्ये आयर्लंडच्या खेळाडूची कमाल, विराट कोहलीला टाकलं मागं
मुंबई,
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली हा भारताचाच नाही तर जगातील आघाडीचा बॅटर आहे. क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात त्यानं सातत्यानं रन काढले आहेत. क्रिकेटमधील अनेक रेकॉर्ड हे विराटच्या नावावर आहेत. त्याचा एखादा रेकॉर्ड मोडला तर ती कोणत्याही खेळाडूसाठी मोठी गोष्ट असते. टी20 क्रिकेटमधील विराटचा एक महत्त्वाचा रेकॉर्ड आयर्लंडच्या खेळाडूनं मोडला आहे.
आयर्लंडचा स्टार बॅटर पॉल स्टर्लिंग यानं ही कामगिरी केली आहे. विराटचा टी20 क्रिकेटमधील सर्वाधिक फोर लगावण्याचा रेकॉर्ड त्यानं मागं टाकला आहे. आता आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक फोर लगावणारा स्टर्लिंग हा बॅटर बनला आहे. त्यानं रविवारी यूएई विरुद्ध हा विक्रम केला आहे. स्टर्लिंगनं या मॅचमध्ये 35 बॉलमध्ये 40 रन काढले. या खेळीत त्यानं 4 फोर लगावले.
स्टर्लिंगचे आता आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 288 फोर झाले आहेत. तर विराटच्या नावावर 285 फोर आहेत. विशेष म्हणजे त्यानं ही कामगिरी विराटपेक्षा कमी मॅचमध्ये पूर्ण केलीय. विराटनं 90 मॅचमध्ये 285 फोर लगावले आहेत. तर स्टर्लिंग 89 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये ही कामगिरी केली आहे.
स्टर्लिंग आणि केविन ओ ब-ायन यांच्या खेळीच्या जोरावर या मॅचमध्ये आयर्लंडनं पहिल्यांदा बॅटींग करताना निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 आऊट 134 रन केले. स्टर्लिंग रोहन मुस्तफाच्या बॉलवर त्याच्याकडंच कॅच देऊन आऊट झाला. ओ ब-ायनलाही मुस्तफानं आऊट केलं.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक फोर लगावण्याच्या यादीत स्टर्लिंग आणि विराट कोहलीनंतर मार्टिन गप्टीलचा नंबर आहे. या यादीमध्ये रोहित शर्मा (रोहित शरमा) चौथ्या तर ऑॅस्ट्रेलियाच्या टी20 टीमचा कॅप्टन एरोन फिंच चौथ्या क्रमांकावर आहे.