नवरात्रोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी किती बदलले सोन्याचे दर; लगेचच पाहा आणि खरेदीचा बेत आखा

मुंबई,

मागच्या बर्‍याच काळापासून सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ- उतार पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हीही सोनं खरेदी करण्यासाठी योग्य त्या संधीच्या प्रतिक्षेत आहात, तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. सोन्याचे दर काही अंशी कमी होत असल्याचं चित्रही नाकारता येत नाही.

मागच्या काही दिवसांची आकडेवारी पाहिली तर, सोनं 9300 रुपयांनी स्वस्त झाल्याचं दिसून आलं. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्सवर सोन्याच्या दरांत वाढ झाल्याची नोंद करण्यात आली. आज एमसीएक्सवर डिसेंबरच्या डिलीव्हरीसाठीचे सोन्याचे जर 0.14 टक्क्यांनी वधारले. तर, चांदीच्या दरांमध्ये 0.48 टक्क्यांनी घरसरण झाली.

आजच्या दिवशी डिसेंबरसाठी डिलीव्हरी होणार्‍या सोन्याचे भाव 46892 रुपये असल्याचं कळत आहे. तर, 1 किलो चांदीसाठी 60936 इतके रुपये मोजावे लागत आहेत.

2020 बाबत सांगावं तर, मागील वर्षी याच दरम्यान सोन्याचे दर प्रती 1 तोळा 56200 इतके होते. तर आज हेच दर 46 हजारांचया घरात पोहोचले आहेत. याचाच अर्थ सोन्याच्या दरात वर्षभरात 9308 रुपयांनी घसरण झाली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!