विदर्भात आज फक्त 18 रुग्ण, मराठवाड्यात 157.. आता उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात रुग्णसंख्या जास्त
मुंबई,
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. सध्या शहरी भागत जास्त प्रमाणात रुग्ण आढळत असून ग-ामीण भागात रुग्णांची संख्या कमी झालेली पहायला मिळत आहे. विदर्भात काही जिल्ह्यात तर एकही रुग्णांची नोंद आज झाली नाही. मराठवाड्यातही रुग्णसंख्या कमी झाली आहे. सध्या उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि पुणे, मुंबई आणि उपनगरांत जास्त रुग्ण आढळत आहेत.
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 2 हजार 620 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 943 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 97 हजार 018 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे. दरम्यान, राज्यात आज 59 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 33 हजार 11 सक्रीय रुग्ण आहेत.
मुंबईत आज 458 नवीन रुग्णांची नोंद
मुंबईत मागील 24 तासांत 458 नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 185 रुग्ण कोरोनातून बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. परिणामी बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 72 लाख 2 हजार 821 इतकी झाली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा दर 97म झालाय. सध्या शहरात 4 हजार 784 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. दुप्पटीचा दर आता 1118 दिवसांवर गेला आहे.
पुण्यात आज 125 नवीन रुग्ण
पुणे महापालिका क्षेत्रात आज 125 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 502226 इतकी झाली आहे. दरम्यान, आज 155 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 491627 इतकी झाली आहे. आज तीन कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात 1550 सक्रीय रुग्ण उपचार घेत असून 187 रुग्ण गंभीर आहेत.
देशात 24 तासांत 21 हजार 257 नवे कोरोनाबाधित; तर 271 रुग्णांचा मृत्यू
देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 21 हजार 257 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 271 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल (गुरुवारी) देशात 22 हजार 431 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती.