एका परदेशी नागरिकाला एनसीबीने केली अटक, ड्रग्स पुरवठा केल्याचा आरोप
मुंबई,
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) बुधवारी मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी एका परदेशी नागरिकाला अटक केली. या व्यक्तीवर या प्रकरणात आधीच अटक झालेल्यांना ड्रग्स पुरवठा केल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परदेशी नागरिकाला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या कारवाई अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ही अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाची अधिक माहिती देताना मुंबई, एनसीबीचे संचालक समीर वानखेडे म्हणाले की, आतापर्यंत या प्रकरणात 18 जणांना अटक करण्यात आली आहे. अधिकचा तपास सुरू असून काही दुवे बिटकॉइनशी संबंधित असतील. परंतु ती माहिती आत्ता शेअर करता येत नाही. यामुळे तपासात अडथळा येऊ शकतो.
या प्रकरणात अरबाज मर्चंट, विक्रांत छोकर, इश्मीत सिंग च-ा, मोहक जैस्वाल, मुनमुन धामेजा आणि नुपूर सतीजा यांच्यासह बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान, याला अटक करण्यात आली. र्ण्ँ च्या टीमने 2 ऑॅक्टोबर रोजी मुंबई इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल आणि कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला. या छाप्या दरम्यान क्रूझमधून कोकेन, मेफेड्रोन, चरस, हायड्रोपोनिक आणि एमडीएमई सारखी औषधे सापडली आहेत. यासह 1.33 लाख रुपये रोख देखील जप्त करण्यात आले.
कार्डिया क्रुझ’वरील ड्रग्स पार्टीची कारवाई बोगस आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंटला पकडणारे अधिकारी हे एनसीबीचे नसून, ते भाजपचे पदाधिकारी असल्याचा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे. अरबाज मर्चंटला भाजपचा उपाध्यक्ष मनीष भानुशाली यांनी ताब्यात घेतल्याचा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला आहे. भाजप आणि एनसीबीचे काय कनेक्शन आहे, हे एनसीबीच्या अधिकार्यांनी स्पष्ट करावे, असेही मलिक यांनी स्पष्ट केले. या आरोपांमुळे आता एनसीबीच्या कारवाईवर संशय निर्माण झाला आहे.