शिवसेनेच्या रणनितीमुळे भाजपला धक्का; दिवंगत खा. मोहन देलकर यांच्या पत्नीचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई,

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी फेब-ुवारी महिन्यात मुंबईतील सी ग-ीन हॉलेटमध्ये पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. त्यांच्या सुसाइड नोटमध्ये अनेक धक्कादायक आरोप करण्यात आले होते. दरम्यान त्यांनी मुंबईत येऊन आत्महत्या का केली याबाबतही मोठी चर्चा सुरू होती.

दादरा हवेली लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार मोहन भाई देलकर यांच्या पत्नी कला बेन देलकर या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाल्या आहे. कला बेन देलकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत. दादरा हवेली लोकसभा मतदारसंघाची पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची उमेदवारी कला बेन देलकर यांना देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या काळात शिवसेनेने देलकर यांच्या कुटुंबाला पाठिंबा दर्शवला होता. त्यांच्या आत्महत्येची कडक चौकशी केली जाईल, असंही आश्वासन दिलं आहे. मोहन डेलकर (58) हे 1989 पासून दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील खासदार होते. त्याशिवाय ते दादरा आणि नगर हवेली येथून 7 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. 2009 मध्ये ते काँग-ेस पक्षात दाखल झाले. परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग-ेस पक्ष सोडला आणि अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि ते मोठ्या मतांनी पुन्हा विजयी झाले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!