बिग बॉसमध्ये सहभागी भावाला सपोर्ट करणार्‍या ‘या’ पोस्टमुळे आदर्श शिंदे झाला ट्रोल

मुंबई,

वेगवगेळ्या कारणांमुळे छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग-स्त शो ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझन सतत चर्चेत आहे. उत्कर्ष या आठवड्याच्या ‘हल्लाबोल’ टास्कमध्ये संचालकाच्या भूमिकेत होता. त्याने टास्कदरम्यान पक्षपात केल्याबद्दल विकेण्डला बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर उत्कर्ष शिंदेची शाळा घेताना दिसले. त्यानंतर उत्कर्षचा भाऊ आदर्श शिंदे त्याला सपोर्ट करताना दिसला आहे. आपल्या सोशल मीडियावर आदर्शने एक भली मोठी पोस्ट शेअर करत भावाला सपोर्ट केला आहे. ‘बिग बॉस मराठी’ ला या पोस्टमध्ये डबल ढोलकी असे म्हटले आहे. त्याच्या या पोस्टमुळे नेटकरी त्याच्यावर संतापले असून आदर्श सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

सोशल मीडियावर आदर्शने एक पोस्ट शेअर करत शोमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल त्याचे मत मांडले आहे. उत्कर्ष शिंदे याचे विचार सुरवातीला विशाल या स्पर्धकासोबत पटत नव्हते. तरीही त्याने विशालचा वापर कॅप्टनसीसाठी केला. चावडीला याचा राग आला आणि उत्कर्ष डबल गेम खेळत आहे म्हणजेच डबल ढोलकी असल्याचा अर्थ काढण्यात आला, अशा आशयाची मोठी पोस्ट त्याने शेअर केली आहे.

सपर्धकांना गेल्या आठवड्यात ‘हल्लाबोल’ हा टास्क देण्यात आला होता. या टास्कच्या वेळेस संचालक, कॅप्टन उत्कर्ष एकाच गटाच्या बाजूने निर्णय घेत असल्याचे महेश यांना दिसले. टीम ‘बी’ मधील सदस्य सोनाली पाटील जेव्हा मिठाचे पाणी टीम ‘ए’ वर फेकत होती त्यावेळी उत्कर्षने तिला अडवले. पण टीम ‘ए’ ने मिरच्यांचा वापर टीम ‘बी’ वर केला, तेव्हा उत्कर्षने त्यांना अडवले नाही. असा भेदभाव का केला?, असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी ‘बॉसची चावडी’ या एपिसोडच्या वेळीस केला होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!